शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह रात्रभर पडून ; सावर्डेजवळ अपघातात महिलेसह दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 21:13 IST

हा परिसर निर्जन असल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी दुचाकीचे अवशेष विखरून पडले होते. सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या वस्तीवरील ग्रामस्थांना अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी तासगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.

ठळक मुद्देदुचाकी झाडावर आदळली

तासगाव : मणेराजुरी-सावर्डे रस्त्यावर दुचाकी झाडावर आदळून महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. प्रवीण ऊर्फ अप्पू तमण्णा भिसे (वय ३५, रा. मुरुंगडी, ता. अथणी) व सुरेखा काशिनाथ नाईक (२७, रा. लिंगनूर, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री फुटका घाण्याजवळील अपघाती वळणावर घडला. आसपास वस्ती नसल्यामुळे बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

प्रवीण ऊर्फ अप्पू तमण्णा भिसे हा सावर्डे येथील फुटका घाणा परिसरातील पोपट माळी यांच्या द्राक्षबागेत शेतमजूर म्हणून पंधरा दिवसांपासून कामाला येत होता. मंगळवारी रात्री नऊ वाजेपर्यंत बागेत औषध फवारणी करून तो त्याच्या खोलीवर परतला, पण रात्री उशिरा तो मालकाची दुचाकी (क्र. एमएच १० एएल १४४५) घेऊन मालगाव (ता. मिरज) येथे गेला. येथून तो सुरेखा काशिनाथ नाईक या महिलेस घेऊन रात्री उशिरा सावर्डेकडे परतत होता. फुटक्या घाण्याजवळील धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने भरधाव दुचाकी थेट रस्त्याकडेच्या लिंबाच्या झाडावर आदळली. यामध्ये दोघेही उडून रस्त्यावर पडले. हा परिसर निर्जन असल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी दुचाकीचे अवशेष विखरून पडले होते. सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या वस्तीवरील ग्रामस्थांना अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी तासगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.मृत प्रवीण यास दोन मुले, पत्नी असून, ते सर्व अथणी येथे मजुरी करतात. सुरेखा हिला चार अपत्ये आहेत. अपघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी पोलीस पाटील सुरेश खराडे-पाटील व पंचायत समिती सदस्य अमोल माळी यांनी धाव घेऊन याची पोलिसांना व नातेवाईकांना माहिती दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास सहायक निरीक्षक रत्नदीप साळुंखे करीत आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात