शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दोनशे रूपयाच्या बनावट नोटा, अनेक भाजीविक्रेत्यांना अज्ञाताचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 13:01 IST

सांगलीतील संजयनगर येथील आठवडा बाजारात बुधवारी रात्री एका अज्ञाताने ग्राहक बनून बाजारातील आठ ते दहा भाजीपाला विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या बनावट नोटा देऊन माल खरेदी केला. रात्री उशिरा हिशेब करताना विक्रेत्यांना या नोटांबद्दल संशय आला. त्यांनी जाणकारांना दाखविल्यानंतर त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशा बनावट नोटा खपविणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देसुरक्षा धागा नसलेल्या नोटा आठवडा बाजारात खपविल्याअनेक भाजीविक्रेत्यांना अज्ञाताचा गंडा

संजयनगर : सांगलीतील संजयनगर येथील आठवडा बाजारात बुधवारी रात्री एका अज्ञाताने ग्राहक बनून बाजारातील आठ ते दहा भाजीपाला विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या बनावट नोटा देऊन माल खरेदी केला. रात्री उशिरा हिशेब करताना विक्रेत्यांना या नोटांबद्दल संशय आला. त्यांनी जाणकारांना दाखविल्यानंतर त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशा बनावट नोटा खपविणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.संजयनगर येथे आठवड्याचा बाजार बुधवारी भरत असतो. नेहमीप्रमाणे बुधवारी बाजार भरला होता. रात्री ९ च्या सुमारास एक अनोळखी ग्राहक आला आणि त्याने येथील बाजारात भाजी विक्रेत्या शालन शेळके यांच्याकडून अर्धा किलोची वांगी घेतली व त्यांना दोनशे रूपयाची बनावट नोट दिली. त्यांच ग्राहकांने सोनाबाई कोळपे यांच्यासह सुमारे आठ विक्रेत्यांना अशाचप्रकारे बनावट नोटा दिल्या.

बाजारात ग्राहकांची गर्दी असल्याने विके्रत्यांनी घाईगडबडीत नोटा तशाच स्वीकारल्या. रात्री उशीरा बाजार संपल्यावर हिशेब करताना भाजी विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या नोटेबद्दल शंका वाटली. काही जाणकार लोकांना दाखविल्यानंतर नोटा बनावट असल्याचे दिसून आले. या नोटांमधील हिरवा व निळ््या रंगात बदलणारा सुरक्षा धागा अस्तित्वात नव्हता. दोनशे रुपयांच्या आकड्यामागे चक्र दिसत नव्हते.

हुबेहुब दिसणाऱ्या या नोटांची मोठ्या प्रमाणात छपाई झाल्याचीही शक्यता आहे. यामागे एखादी मोठी टोळी असल्याचाही संशय व्यक्त होत आहे. सांगली जिल्ह्यात यापूर्वी अनेकदा बनावट नोटांच्या घटना उजेडात आल्या आहेत. विविध पोलिस ठाण्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळींविरोधात गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यामुळे या टोळीचा छडा लावून सामान्य लोकांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी नागरीकांतून होत आहे.सुरक्षेचा प्रश्न गंभीरसंजयनगर येथील आठवडा बाजारात पाकीट मारणे , महिलांची छेड छाड करणे असे प्रकारही घडत आहेत. आता बनावट नोटांचाही प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सर्वच दृष्टीने येथील बाजार असुरक्षित बनला आहे. त्यामुळे या बाजारात पोलीस बंदोबंस्त ठेवावा, अशी मागणी काही विक्रेत्यांनी केली.

टॅग्स :Note BanनोटाबंदीSangliसांगली