शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Ranbir-Alia : प्राण्यांच्या अनाथालयात दोघांचा जीव जडला; अश्वांच्या जोडीला मिळाले 'आलिया-रणबीर'चे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 20:35 IST

प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ॲनिमल राहत संस्थेने त्यांना आयुष्यभर स्मरणात राहील, अशी गोड भेट दिली आहे.

सांगली : बॉलीवूडचे नवविवाहित हॉट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना लग्नसोहळ्यात असंख्य भेटवस्तू मिळाल्या असतील. त्यात काही नवलही नसावे. मात्र प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ॲनिमल राहत संस्थेने त्यांना आयुष्यभर स्मरणात राहील, अशी गोड भेट दिली आहे. संस्थेच्या प्राणी अनाथालयातील अश्वाच्या जोडीचे नामकरण रणबीर आणि आलिया असे केले आहे.

जखमी, बेवारस किंवा संकटग्रस्त प्राण्यांसाठी संस्थेचे बेळंकी (ता. मिरज) येथे अनाथालय आहे. तेथील अश्वांच्या जोडीचे शुक्रवारी नामकरण करण्यात आले. यातील घोडी विवाह समारंभात नाचण्यासाठी किंवा मिरवणुकीसाठी वापरली जायची, तर घोडा मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे व्हिक्टोरिया खेचण्यासाठी वापरला जायचा. व्यावसायिक मंदीमुळे घोडीला मालकाने बेवारस, जखमी अवस्थेत सोडून दिले होते, तर घोडा मुंबईतून जप्त करण्यात आला होता. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दोहोंवर अनाथालयात उपचार केले. आपुलकीने काळजी घेतली. सध्या दोघेही ठणठणीत आहेत. खेळण्या-बागडण्यासाठी विस्तीर्ण मैदान व सोबती आहेत. दोहोंनी परस्परांना जीव लावल्याचे कार्यकर्त्यांच्या ध्यानी आले. त्यावरुनच नामकरणाची संकल्पना सुचली.

अभिनेता रणबीर कपूरला प्राण्यांविषयक अतिव जिव्हाळा आहे. या दांपत्याने लग्नसोहळ्यात घोड्यांचा वापर टाळला. प्राण्यांवरील प्रेम दाखविण्यासाठी हा अतिशय योग्य प्रसंग होता. लग्नसोहळ्याच्या जल्लोषात संवेदनशील घोडे घाबरण्याची किंवा बुजण्याची शक्यता असते. रणबीरच्या निर्णयाने घोड्यांना संरक्षण मिळाले. त्याच्या प्राणीप्रेमाचे अनुकरण सर्वांनी करायला हवे. त्याच्या निर्णयाप्रती कृतज्ञता म्हणून अनाथालयातील जोडीचे नामकरण आलीया व रणबीर असे केले.डॉ. नरेश उप्रेती,मुख्य अधिकारी, ॲनिमल राहत, सांगली

टॅग्स :Ranbir Kapoorरणबीर कपूरAlia Bhatआलिया भटRanbir Alia Weddingरणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठ