शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ढवळेश्वर येथे दोन धाडसी चोऱ्या, विटा पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 19:54 IST

बंद घराचे कुलूप तोडून ढवळेश्वर (ता. खानापूर) येथे दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी रोख २ लाख ६५ हजार रूपयांसह साडेचार लाख रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास ढवळेश्वर येथे घडली. याप्रकरणी रात्री उशिरा विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देढवळेश्वर येथे दोन धाडसी चोऱ्याविटा पोलीस ठाण्यात गुन्हा

विटा : बंद घराचे कुलूप तोडून ढवळेश्वर (ता. खानापूर) येथे दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी रोख २ लाख ६५ हजार रूपयांसह साडेचार लाख रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास ढवळेश्वर येथे घडली. याप्रकरणी रात्री उशिरा विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, ढवळेश्वर येथील शहाजी गंगाराम किर्दत या ज्येष्ठ नागरिकाच्या घरातील रोख १ लाख ५० हजार रुपयांसह अंदाजे ३ लाख १० हजार रूपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असताना, त्यांच्या तक्रारीऐवजी १ लाख १५ हजाराची रोकड लंपास झालेल्या विकास जाधव यांची पोलिसांनी फिर्याद घेतल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ढवळेश्वर येथे विकास विजय जाधव हे उन्हाळा असल्याने घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मुख्य दरवाजाला कुलूप लावले होते. सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी लोखंडी कपाटातील १ लाख १५ हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या शहाजी किर्दत यांच्या घराकडे मोर्चा वळविला. किर्दत हे मुंबई येथे नोकरीनिमित्त स्थायिक आहेत. सुटी असल्याने ते गावी ढवळेश्वरला आले होते. परंतु, सोमवारी ते नातेवाईकांकडे गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्याही घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटातील रोख १ लाख ५० हजार रुपयांसह १ लाख ६० हजार रूपये किमतीचे ६५ ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ३ लाख १० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.

ढवळेश्वर येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, चोरट्यांनी येथील शहाजी किर्दत यांच्या घरातील ३ लाख १० हजार रूपयांचा सर्वाधिक ऐवज लंपास केला असतानाही, पोलिसांनी १ लाख १५ हजार रूपयांची चोरी झालेल्या विकास जाधव यांची मूळ फिर्याद घेतल्याने पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली