शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

कामातील हलगर्जीपणा भोवला, सांगली महापालिकेचे दोन शाखा अभियंते निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:59 IST

आयुक्तांचा दणका : दोघा अधीक्षकांची वेतनवाढ रोखली

सांगली : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बांधकाम विभागातील शाखा अभियंता आलम अत्तार व पंकजा रुईकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर नगररचना विभागाचे अधीक्षक सुहास व्हटकर व बांधकाम विभागाचे अधीक्षक राजेश शिंदे यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेशही आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले. आयुक्तांच्या दणक्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे.महापालिकेच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांनी सोमवारी बैठक घेतली होती. या बैठकीत शासकीय पत्रव्यवहार, लोकायुक्त प्रकरणे, मुख्यमंत्री सचिवालयातील संदर्भ तसेच विधानसभेतील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. बांधकाम व नगररचना विभागातील अधीक्षकांना त्यांच्या विभागातील प्रलंबित कामांची माहिती नव्हती.

आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यांना कर्तव्यांची जाणीव नसल्याचे व प्रशासकीय जबाबदारीत हलगर्जीपणा केला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नगररचना विभागाचे अधीक्षक सुहास व्हटकर व बांधकाम विभागाचे अधीक्षक राजेश शिंदे यांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली.कार्यपद्धतीनुसार काम न करणे, विनापरवाना गैरहजर राहणे, तसेच वरिष्ठांच्या आदेशात ढिलाई केल्याचे उपअभियंत्यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले होते. त्यांचे कामकाज असमाधानकारक ठरल्याने शाखा अभियंते पंकजा अरविंद रुईकर व आलम अजीज अत्तार यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त सत्यम गांधी यांनी ही कारवाई केली.नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करणे आणि प्रशासकीय शिस्त राखणे, ही प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. यापुढे कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त गांधी यांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Negligence at work: Two Sangli corporation engineers suspended.

Web Summary : Two Sangli Municipal Corporation engineers suspended for negligence. Two superintendents face pay cuts for dereliction of duty. Commissioner warns of strict action for future lapses.