कुपवाड : शहरातील हनुमाननगरमधील एका दुकानाच्या आडोशाला देशी दारूची विक्री करीत असताना, एका तरुणाला कूपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळील २ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गणेश रथमानी दुधाळ (वय ३०, रा.संजयनगर, सांगली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुपवाड एमआयडीसी रस्त्यालगत असलेल्या हनुमाननगरमधील एका दुकानाच्या आडोशाला एक तरुण देशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी संशयित गणेश दुधाळ याला ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील २ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच बामणोली (ता.मिरज) येथील श्रीनगरमधील एका घराच्या आडोशाला जादा दराने हातभट्टी दारुची विक्री करीत असताना, कूपवाड पोलिसांनी एका तरुणास ताब्यात घेऊन, त्यांच्याजवळील ४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विनोद दाविद सकटे (वय २१,रा. श्रीनगर, बामणोली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.