शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक, गोळ्यांचा साठा जप्त; एलसीबीची कारवाई 

By शरद जाधव | Updated: May 11, 2023 16:48 IST

सांगलीसह मिरज शहरात नशेसाठी काही विशिष्ट गोळ्यांचा वापर होत असल्याचे समोर आले होते

सांगली : शहरात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगलीत कारवाई करत दोघांना जेरबंद केले. अनिकेत विजय कुकडे (वय २१, रा. गुजर बोळ, बुरूड गल्ली,सांगली) व उमर सलीम महात (२०, रा. गवळी गल्ली,सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या २५० गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.सांगलीसह मिरज शहरात नशेसाठी काही विशिष्ट गोळ्यांचा वापर होत असल्याचे समोर आले होते. गेल्या आठवड्यात पोलिसांनी काहीजणांवर कारवाई केली होती. मानसिक आजारावरील या गोळ्यांचा नशेसाठी वापर होत असल्याचे समोर येताच, जिल्हाधिकाऱ्यांनीही बैठक घेत कारवाईच्या सूचना दिल्या हाेत्या. त्यानुसार एलसीबने कारवाईसाठी खास पथक तयार केले आहे.हे पथक शहरात गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली की, शहरातील कर्नाळ रोडवरील बुरूड गल्ली परिसरातील शिवमुद्रा चौकात दोघे संशयित नशेच्या गोळ्या विक्रीसाठी थांबले आहेत. पथकाने छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी गोळ्यांव्दारे नशा करणाऱ्यांना चढ्या दराने गोळ्या विक्रीसाठी थांबल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या २५० गोळ्या जप्त करण्यात आल्या.कुकडे याने या गोळ्या कुठून आणल्या याबाबत विचारणा केली त्यात त्याने शाहबाज शेख उर्फ जॅग्वार (रा. कर्नाळ रोड,सांगली) याच्याकडून उमर महात याने विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, सुधीर गोरे, संदीप पाटील, सागर लवटे, राहूल जाधव, विक्रम खोत आदीच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली.कारवाई सुरूच राहणारया गोळ्या घेतल्याने मेंदूवर गुंगीकारक परिणाम होतात असे औषध निरीक्षक विकास पाटील यांनी सांगितले. संशयित कुकडे हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीसह अन्य गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नशेसाठी अवैधरित्या नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्यावर कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी