जिल्हा परिषद आणि खासगी प्राथमिकच्या ८४१ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या तीन आणि एका खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा कोरोनाचाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या शाळा बंद ठेवल्या होत्या. उर्वरित ८३७ शाळा सुुरु झाल्या आहेत. या शाळांमध्ये ४८ हजार ५९५ विद्यार्थीसंख्या असून त्यापैकी चक्क २५ हजार ७४८ विद्यार्थी शाळेत हजर होते. माध्यमिकच्या ६४० शाळांमधील २९ हजार १४ विद्यार्थी शाळेत दाखल झाले होते. पाचवी ते आठवीचे वर्ग संभाळणारे पाच हजार ८९५ शिक्षकापैकी ९५ टक्के शिक्षकांची उपस्थिती होती. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देतानाच ऑक्सीमीटरच्या साह्याने पल्स आणि ऑक्सिजनची तपासणी केली जात होती. सॅनिटायझरही शाळेच्या प्रवेद्वारातच ठेवले होते. पालकांचे संमतीपत्रही घेतले जात होते. सध्या नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग दिवसाआड सुरू आहेत. त्याच धर्तीवर पाचवी ते आठवीचे गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांसाठी दिवसाआड व दोन तासांचे वर्ग भरणार आहेत. एका विद्यार्थ्याला आठवड्यातून तीन दिवस वर्गात हजर राहावे लागेल. शहरातील बहुतांशी शाळांमध्ये तुरळकच विद्यार्थ्यांची उपस्थिती होते. ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
कोट
दहा महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्यामुळे अनेक मित्र भेटल्यामुळे खूप आनंद झाला. शाळेत शिक्षकांनी खूप काळजी घेतली. सॅनिटायझरचा वापर केला आणि शाळेत तापमाणही तपासले जात होते.
-संदीप पाटील, विद्यार्थी, सांगली.
कोट
शाळांनी कोरोनाबाबतची सर्व जबाबदारी पालकांवरच टाकली आहे, ते पूर्णता चुकीचे आहे. शाळांनीही शाळेत विद्यार्थी आल्यानंतर त्यांची काळजी घेण्याची गरज आहे.
-संतोष माने, पालक.
चौकट
पहिल्या दिवशी उपस्थिती
विद्यार्थी : ५४७६२
शिक्षक : ५८९५
शाळा सुरु : ८३७
शिक्षकांची चाचणी : ५३९१
पॉझिटिव्ह शिक्षक : ४