शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

बारा गुंठ्यात २५ आंब्यांच्या झाडाची बाग । कासेगावच्या निवृत्त शिक्षकाने जपला छंद, कष्टाला यशाचे कोंदण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:13 IST

व्यापाऱ्यांना विक्री नाही -- सर्वसामान्य लोकांना हे आंबे माफक दरात मिळावेत म्हणून रघुनाथ निकम यांनी आजअखेर कोणत्याही व्यापाºयाला विक्री केलेली नाही. दरवर्षी त्यांना खर्च वजा जाता एक लाख रुपयापेक्षा जास्त नफा मिळतो. ही ‘आमराई’ त्यांना उतारवयातही जगण्याची नवी उमेद व प्रेरणा देत आहे.

ठळक मुद्दे दरवर्षी लाखावर नफा

प्रताप बडेकर ।कासेगाव : छंद जपला की जीवनात नवी चेतना व उत्साह येत असतो. अशाच छंदातून कासेगाव (ता. वाळवा) येथील निवृत्त शिक्षकाने घरालगत १२ गुंठे जागेत पंचवीस आंब्यांची बाग लावली आहे. या आंब्यांच्या झाडांपासून त्यांना वर्षाकाठी एक लाख रुपयापेक्षा जास्त नफा मिळतो. आंबे चवीला अतिशय गोड असल्याने परिसरातून मोठी मागणीही आहे.

रघुनाथ मारुती निकम (वय ८०, रा. कासेगाव) असे त्यांचे नाव आहे. कासेगाव येथील नवीन महाविद्यालय रस्त्यालगत त्यांचे घर आहे. या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत त्यांनी १९८० मध्ये २५ आंब्याची कलमी रोपे लावली. यामध्ये २० रोपे केशर व पाच रोपे हापूस आंब्याची होती. दोन वर्षांनंतर त्या झाडांना आंबे लागण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कमी प्रमाणात आंबे लागले होते, मात्र तीन वर्षांनंतर भरपूर प्रमाणात आंबे लागण्यास सुरुवात झाली.

आता दरवर्षी प्रत्येक झाडापासून १००० पेक्षा जास्त आंबे मिळत आहेत. सर्व मिळून वर्षाला ३० हजारावर आंबे मिळतात. हे सर्व आंबे घरातच नैसर्गिकरित्या पिकवले जातात. त्याची विक्रीही घरातूनच होते. परिसरातील लोकांना या आंब्याची चव व प्रत माहिती असल्याने ते घरी येऊन घेऊन जातात. निकम यांनी लहानपणापासूनच असलेल्या निसर्ग, झाडांचे संगोपनाच्या आवडीला कृतीत उतरविले. 

टॅग्स :SangliसांगलीMangoआंबा