शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करून खून प्रकरणी अल्पवयीन मुलास बारा वर्षे शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 05:40 IST

गेल्या वर्षी तुंगमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अत्यंत संवेदनशील असलेल्या या खटल्याची वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षी तुंगमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अत्यंत संवेदनशील असलेल्या या खटल्याची वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : तुंग (ता. मिरज) येथे अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवीत तिच्यावर बलात्कार करून गळा आवळून खून केल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला जिल्हा न्यायालयाने बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दरम्यान, बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम नवीन कायदा दुरुस्तीनुसार चाललेला राज्यातील पहिला गुन्हा, तर शिक्षा झालेली देशातील पहिलीच घटना ठरली आहे.

गेल्या वर्षी तुंगमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अत्यंत संवेदनशील असलेल्या या खटल्याची वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण झाली आहे. तुंगजवळील एका भागातील अल्पवयीन मुलगी २० मे २०२० रोजी सायंकाळी सातपासून बेपत्ता झाली होती. रात्रभर शोध घेऊनही ती सापडली नव्हती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा शोध सुरू करण्यात आला होता. हाळभाग परिसरात एका शेतात तिचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीने पीडित मुलीला उसाच्या शेतात नेऊन मोबाईलवर तिला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर मुलगी रडू लागल्याने तिला खाली पाडून संशयिताने तिचा गळा आवळून खून केला होता. न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला प्रत्येक कलमांसाठी वेगवेगळी बारा वर्षे, दंड न भरल्यास तीन वर्षे व बालन्याय अधिनियमानुसार तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

कायदा दुरुस्तीनंतर पहिलाच निकालगुन्हा घडला यावेळी आरोपीचे वय १६ वर्षे आठ महिने होते. आरोपी अज्ञान असल्याने बाल न्याय अधिनियमाच्या कायद्यातील दुरुस्तीनुसार गुन्हा क्रूरतेचा असल्याने विशेष न्यायालयात चालला. नवीन कायदा दुरुस्तीनुसार राज्यातील पहिलाच हा गुन्हा चालला; तर आरोपीस शिक्षा झालेली संपूर्ण देशातील ही पहिलीच घटना ठरली.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईCourtन्यायालय