शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

चंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांना महाराष्ट्रधर्म शिकवावा, दोन प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:26 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाटील यांनी कार्यकर्त्यांना आंदोलन कसे करावे, कपडे कोणते घालावेत हे शिकविण्यापेक्षा महाराष्ट्रधर्म पाळायला शिकविले असते तर अधिक संयुक्तिक ठरले असते, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरून केली.

ठळक मुद्देचंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांना महाराष्ट्रधर्म शिकवावा : जयंत पाटील भाजप-राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांमध्ये ट्विट वॉर, दोन प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली

सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाटील यांनी कार्यकर्त्यांना आंदोलन कसे करावे, कपडे कोणते घालावेत हे शिकविण्यापेक्षा महाराष्ट्रधर्म पाळायला शिकविले असते तर अधिक संयुक्तिक ठरले असते, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरून केली.चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पेजवर कार्यकर्त्यांना आंदोलनाबाबत सल्ले दिले आहेत. त्याचे स्क्रीनशॉटही जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध करून त्याचा समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना देताना म्हटले आहे की, प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत:च्या घरीच गॅलरीत, वऱ्हाड्यात किंवा अंगणात दो गज की दुरीचे पालन करीत सदस्यांसह एकत्र यावे.

 

तोंडाला मास्क घालावा, काळी रिबिन, काळा रुमाल, काळी ओढणी बांधावी किंवा काळ्या फिती लावाव्यात. काळे कपडे असतील तर ते परिधान करावेत. मिडियाला याबाबत कळवावे किंवा स्वत: फोटो काढून ते माध्यमांना पाठवावेत. उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार असे फलकही लावावेत.

या गोष्टीवर जयंत पाटील यांनी गुरुवारी ट्विट करताना म्हटले आहे की, चंद्रकांतदादांनी भाजप कार्यकर्त्यांना आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा महाराष्ट्रधर्म पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते तर संयुक्तिक ठरले असते. दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी असा शायराना टोलाही त्यांनी लगावला.दोन प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपलीसत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांमधील हे ट्विटर वॉर चांगलेच रंगले आहे. दोन्ही बाजुचे समर्थक व कार्यकर्तेही ट्विटरवर भिडले आहेत. राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू असताना आता दिग्गज नेत्यांच्या सहभागाने हा संघर्ष वाढला आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण