शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत हळदीचे संशोधन उपकेंद्र, मग सांगलीला कधी?; टर्मरिक सिटीचे लोकप्रतिनिधी गप्पच 

By संतोष भिसे | Updated: May 31, 2023 17:29 IST

सांगलीच्या तुलनेने रत्नागिरीत हळदीचे अत्यल्प उत्पादन

संतोष भिसेसांगली : हळदीची मोठी बाजारपेठ असलेल्या आणि ‘टर्मरिक सिटी’ अशी ओळख असलेल्या सांगलीत हळद शेती व व्यवसायाच्या विकासासाठी हेतूपुरस्सर काही प्रकल्प राबवण्याबाबत उदासीनताच दिसत आहे. सांगलीच्या तुलनेने हळदीचे अत्यल्प उत्पादन असलेल्या रत्नागिरीत हळदीचे संशोधन उपकेंद्र गेल्या महिन्यात मंजूर झाले, पण येथे मात्र त्यादृष्टीने कोणत्याही हालचाली नाहीत.रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी हळद संशोधन उपकेंद्र आणि विकासविषयक प्रकल्प राबविण्याची आग्रही मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्याला प्राथमिक मंजुरीही दिली. गेल्या काही वर्षांत कोकणात हळदीची शेती वाढली आहे. कोकण विभागात या गेल्या वर्षात १९७ हेक्टर क्षेत्रात हळदीची लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत सांगली जिल्ह्यात साडेचार हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात हळदीची लागवड होते.शिवाय कर्नाटकसह विविध जिल्ह्यांतून आवकही मोठी होते. गेल्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यांतच ६१०३६३ क्विंटल हळदीची आवक झाली आहे. बाजार समितीच्या उलाढालीत हळद अग्रक्रमावर आहे. या स्थितीत हळद शेतीच्या संशोधनासाठी प्रकल्प राबविण्याची मागणी वर्षानुवर्षे होत आहे.यादरम्यान, गेल्या सप्टेंबरमध्ये शासनाने वसमत (जि. हिंगोली) येथे १०० कोटी रूपये खर्चाच्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राला मंजुरी दिली. त्यानंतर रत्नागिरीतही मुख्यमंत्र्यांनी प्राथमिक मंजुरी दिली आहे. या स्थितीत सांगलीकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न स्वाभाविकपणे पुढे येत आहे.गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र वेगाने वाढत आहे. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतही हळद टिकून राहत असल्याने शेतकरी त्याकडे वळले आहेत. शिवाय सिंचन योजनांमुळे पाण्याची उपलब्धता झाल्यानेही हळदीचे क्षेत्र वाढत आहे.

शास्त्रीय मार्गदर्शन, संशोधन व्हावेहळदीची शेती, त्यावर प्रक्रिया ही कामे अद्याप परंपरागत पद्धतीने केली जात आहेत. पण हळदीपुढे रोग, कीड अशा काही समस्या आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना शास्त्रीय मार्गदर्शन आणि संशोधनाची गरज आहे. प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहणारे वाण मिळण्याची गरज आहे. त्यासाठी व्यापारी, लोकप्रतिनिधींकडून शासनावर दबाव गरजेचा आहे. रत्नागिरीकरांनी करून दाखवले, ते सांगलीत का होत नाही, असा प्रश्न आहे.

टॅग्स :SangliसांगलीRatnagiriरत्नागिरी