कामेरीनजीक टायर फुटून ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:26 AM2021-03-18T04:26:56+5:302021-03-18T04:26:56+5:30

कामेरी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील पूर्वेकडील बाजूच्या सेवा रस्त्यावर टायर फुटल्याने ट्रक उलटला. यामध्ये सुमारे ...

The truck overturned with a flat tire near Cameron | कामेरीनजीक टायर फुटून ट्रक उलटला

कामेरीनजीक टायर फुटून ट्रक उलटला

Next

कामेरी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील पूर्वेकडील बाजूच्या सेवा रस्त्यावर टायर फुटल्याने ट्रक उलटला. यामध्ये सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

राजस्थानहून डालडा घेऊन आलेला ट्रक (आर. जे. १९. जीसी ९९००) कोल्हापूरकडे निघाला होता. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास चालक मांगीलाल बिस्नोली (वय ३५) हा जेवण करण्यासाठी एका हॉटेलवर थांबला होता. जेवणानंतर कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्याचा अंदाज न आल्याने महामार्गावर उलट दिशेने येडेनिपाणी पुलाखालून तो कोल्हापूरला जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक उलटला. यात ट्रकचे केबीन व डालड्याचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. चालक मांगीलाल बिस्नोली किरकोळ जखमी झाला आहे.

या घटनेची कुरळप पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलीस नाईक अमोल माळी व पोलीस हवालदार रामजी पाटील तपास करत आहेत.

Web Title: The truck overturned with a flat tire near Cameron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.