शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांच्या गळीत हंगामामुळे जनावरांच्या वाहतुकीला परवानगी

By संतोष भिसे | Updated: October 15, 2022 17:58 IST

जनावरांच्या वाहतुकीला परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर पोलीसांचे तपासणी नाके सुरु होणार आहेत.

सांगली: साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड मजुरांना व शेतकऱ्यांना जनावरांच्या वाहतुकीसाठी शासनाने परवानगी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक पशुसंवर्धन विभागाने शुक्रवारी (दि. १४) जारी केले. दरम्यान, जिल्ह्यात ऊसतोड मजुरांसोबत जनावरांची वाहतूक यापूर्वीच सुरु झाली आहे, पण लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत जनावरांच्या तपासणीसाठी सीमेवर कोणतीही यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही.

कोणत्याही तपासणीविनाच जनावरे जिल्ह्यात येऊ लागली आहेत. लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीवर शासनाने निर्बंध घातले होते, पण कारखान्यांच्या गळीतासाठी निर्बंध सध्या शिथील करण्यात आले आहेत. विदर्भ, मराठवाड्यातून ऊसतोडीसाठी येणाऱ्या मजुरांना सोबत जनावरे आणता येतील, शिवाय स्वत: ऊसाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांनाही निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

यासाठी जनावरांचे २८ दिवसांपूर्वी लसीकरण आवश्यक आहे. तसे प्रमाणपत्र जनावरासोबत आवश्यक असेल. या नियमानंतरही जिल्ह्याच्या सीमा सताड खुल्या दिसत आहेत. विदर्भ, मराठवाड्यातून येणाऱ्या जनावरांच्या तपासणीसाठी किंवा, प्रमाणपत्र पाण्यासाठी कोणतीही यंत्रणा सीमेवर नाही. साखर कारखान्यांनी जनावरांच्या दैनंदिन तपासणी व औषधोपचारासाठी स्वतंत्र खासगी पशुवैद्यक नेमण्याचे आदेश शासनाने दिले आहेत, पण त्याचीही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. राज्यात लम्पीचा उदभव व वेगाने फैलाव विदर्भातच झाला होता, त्यामुळे तेथील जनावरांना जिल्ह्यात प्रवेश देताना सतर्कतेची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

पोलीसांचे तपासणी नाके सुरु होणारजनावरांच्या वाहतुकीला परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर पोलीसांचे तपासणी नाके सुरु होणार आहेत. आंतरराज्य रस्त्यांवर नाके असतील. जनावरांच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासून जिल्ह्यात प्रवेश देण्याचे काम पोलीस करतील. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सदाशिव बेडक्याळे यांनी ही माहिती दिली. 

प्रत्येक जनावरांचे २८ दिवसांपूर्वी लसीकरण केले असेल, तरच जिल्ह्यात प्रवेश आहे. सीमेवर प्रमाणपत्र तपासण्याची यंत्रणा तूर्त सुरु झालेली नाही. पण साखर कारखान्यांना आवश्यक आदेश दिले आहेत. संशयास्पद तसेच लसीकरण नसलेले जनावर २१ दिवस विलगीकरणात ठेवण्यास सांगितले आहे. साखर आयुक्तांनीही तसे आदेश काढले आहेत.- सदाशिव बेडक्याळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

टॅग्स :Sangliसांगलीcowगाय