सांगली : जिल्ह्यातील सात सहाय्यक पोलीस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली, तर दोघांची सांगली जिल्ह्यात बदली झाली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी बदल्याचे आदेश काढले आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शकुंतला वागलगावे, अमितकुमार पाटील, जयंत जाधव, सरिता लायकर यांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली आहे, तर गजानन कांबळे आणि नीलेश बागाव यांची सोलापूर ग्रामीणला बदली झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून सरोजिनी चव्हाण आणि गजेंद्र लोहार या दोघांची सांगली जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. यामध्ये चौघांच्या बदल्या या विनंतीवरून झाल्या आहेत, तर तिघांच्या बदल्या या त्यांचा कालावधी पूर्ण झाल्याने करण्यात आल्या आहेत. दोघांच्या बदल्या या नाकारण्यात आल्या आहेत. बदली झालेल्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.