शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

सांगली-मिरज -कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवारांसह दोन उपायुक्तांची बदली

By अविनाश कोळी | Updated: March 19, 2024 21:05 IST

शासनाचे आदेश : नियुक्तीचे ठिकाण अद्याप अनिश्चित.

सांगली : राज्य शासनाने मंगळवारी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील यांच्या बदलीचे आदेश दिले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या झाल्या असल्या तरी तिन्ही अधिकाऱ्यांना नियुक्तीचे ठिकाण दिलेले नाही. त्यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या सुचनांच्या अनुषंगाने या बदल्या करण्यात आल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या निवडणूक काळात बदल्या करण्याचे धोरण आयोगाने राबविण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त सुनील पवार व उपायुक्त पंडीत पाटील हे दोन्ही अधिकारी सांगली जिल्ह्यातील आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या तीन प्रमुख अधिकाऱ्यांची एकाचवेळी बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सुनील पवार यांची १२ ऑगस्ट २०२२ रोजी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. दीड वर्षाच्या कालावधीतच त्यांची बदली झाली आहे. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी पंडित पाटील यांची नियुक्ती उपायुक्तपदी झाली होती. पाच महिन्यातच त्यांची बदली झाली. राहुल रोकडे यांना काही महिन्यांपूर्वी मुदतवाढ मिळाली होती.

आयुक्त पवार यांनी मुख्याधिकारी पदापासून प्रशासकीय कारकिर्दीस सुरुवात केली होती. त्यांनी आष्टा, इचलकरंजी पालिकेत मुख्याधिकारी म्हणूनही काम केले होते. त्यानंतर सांगली महापालिकेत २०१५ ते २०१८ या कालावधीत ते उपायुक्त म्हणून कार्यरत होते. चार वर्षांनंतर पवार यांची सांगली महापालिकेत बदली झाली होती. दीड वर्षाचा कालावधी झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांची बदली करण्यात आली आहे.

पंडित पाटील यांचे मूळगाव आरग (ता. मिरज) आहे. २०१० साली पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झाली. त्यानंतर पहिली नियुक्ती माझलगाव (जि. बीड) येथील नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून झाली. त्यानंतर सांगलीतील जत, साता-यातील म्हसवड व कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेत त्यांनी मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले. सध्या लोणावळा नगर परिषदेत ते मुख्याधिकारी व प्रशासक म्हणून कार्यरत होते. नंतर सांगली महापालिकेत नियुक्ती झाली होती.  नवे अधिकारी कोण?आयुक्त व दोन्ही उपायुक्तांना नव्या नियुक्तीचे ठिकाण अद्याप दिलेले नाही. त्याबाबतचे आदेश येत्या दोन दिवसांत निघण्याची शक्यता आहे. याशिवाय या तिन्ही अधिकाऱ्यांच्या जागी कोण येणार, याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही.

टॅग्स :Sangliसांगली