विटा ते कोकरूड या राज्यमार्गावर विटा ते कुंडल, ताकारी, बोरगाव ते इस्लामपूर मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण काम पूर्ण झाले असून काही ठिकाणी अजून कामे सुरू आहेत. रेठरे धरण येथील गावालगत असणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण काम बऱ्यापैकी झाले आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला रुंदीकरण केले असून येथील बस स्टँडजवळ प्रभाकर पाटील यांच्या घराजवळ त्यांची जागा जात असल्याने त्यांनी रस्ता वाढवण्यास विरोध केला असून यामुळे येथील रस्त्याचे काम रखडले असून संबंधित कंपनी व बांधकाम विभागाने तातडीने हे काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
पेठ ते शिराळा या राज्यमार्गावर पेठ ते रेठरे धरण हद्दीपर्यंत पेठ येथील शेतकऱ्यांनी रस्ता रुंदीकरणासाठी जमीन जाणार असल्याने त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन या कामास मनाई आदेश मिळविला आहे. येथील सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरील काम अजून स्थगित आहे.