शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : पलूस-कडेगावला पारंपरिक सत्तासंघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:35 IST

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, आमदार विश्वजित कदम यांच्याविरोधात भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख निवडणूक रिंगणात उतरणार, हे निश्चित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कदम-देशमुख घराण्यातील राजकीय सत्तासंघर्षाचे नवे पर्व सुरू होत आहे. यामुळे कदम-देशमुख या परस्परविरोधी घराण्यातील पारंपरिक लढत पुन्हा पाहण्यास मिळणार आहे.

ठळक मुद्देMaharashtra Vidhan Sabha 2019 : पलूस-कडेगावला पारंपरिक सत्तासंघर्षकदम-देशमुख घराण्यातील राजकीय सत्तासंघर्षाचे नवे पर्व

प्रताप महाडिक कडेगाव : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, आमदार विश्वजित कदम यांच्याविरोधात भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख निवडणूक रिंगणात उतरणार, हे निश्चित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कदम-देशमुख घराण्यातील राजकीय सत्तासंघर्षाचे नवे पर्व सुरू होत आहे. यामुळे कदम-देशमुख या परस्परविरोधी घराण्यातील पारंपरिक लढत पुन्हा पाहण्यास मिळणार आहे.डॉ. पतंगराव कदम यांनी १९८५ व १९९० मध्ये अनुक्रमे अपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक जिंकून भिलवडी-वांगी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत खऱ्याअर्थाने कदम-देशमुख घराण्यात थेट सत्तासंघर्ष सुरू झाला.

यावेळी काँग्रेसचे उमेदवार पतंगराव कदम यांचा अपक्ष उमेदवार संपतराव देशमुख यांनी पराभव केला. देशमुख यांचे अकाली निधन झाल्याने १९९६ मध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी काँग्रेसचे पतंगराव कदम यांचा पराभव केला.त्यानंतर १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा चार निवडणुका जिंकून पतंगराव कदम यांनी पूर्वीच्या भिलवडी-वांगी आणि सध्याच्या पलूस-कडेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यापैकी २००४ वगळता अन्य तीन निवडणुकांमध्ये पतंगराव कदम विरुद्ध पृथ्वीराज देशमुख यांच्यात थेट लढत झाली. डॉ. पतंगराव कदम यांना दीर्घकाळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. दरम्यान, देशमुख कुटुंबीयांनीही दोन साखर कारखाने, दोन सूतगिरण्या आणि दूध संघ उभारून कदम यांना शह दिला.दरम्यान, डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी विश्वजित कदम यांना विधानसभेवर बिनविरोध संधी मिळाली. आमदार झाल्यावर विश्वजित कदम यांनी अल्पावधित मतदारसंघ आणि विधानसभेत उल्लेखनीय कामगिरी केली.

दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदचे विद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनीही पारदर्शक कारभार करीत, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या आहेत. या निवडणुकीत विश्वजित आणि संग्रामसिंह हे दोन्ही तगडे उमेदवार आमने-सामने येणार, हे जवळपास निश्चित आहे. यात बाजी कोण मारणार? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे.

टॅग्स :palus-kadegaon-acपलस काडेगावSangliसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदम