शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वाद्ये तेजीत : ढोल, झांज, बॅन्ड, बॅन्जोचे दर लाखापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 20:47 IST

सदानंद औंधेमिरज : गणेशोत्सवासाठी बॅन्ड, बॅन्जो, झांजपथक, ढोलताशा, नाशिक ढोल, लेझीम, धनगरी ढोल, टाळ-मृदंग या पारंपरिक वाद्यांना मागणी आहे. बॅन्ड, बॅन्जो व झांज-ढोलताशा पथकांचे दर ५० हजारांपासून लाखापर्यंत पोहोचले आहेत.गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीसाठी वाद्यपथकांना मोठी मागणी असल्याने बुकिंगसाठी सार्वजनिक मंडळां च्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. महापालिका निवडणूक नुकतीच पार पडल्याने गणेश ...

ठळक मुद्देसार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांची बुकिंगसाठी धावपळ

सदानंद औंधेमिरज : गणेशोत्सवासाठी बॅन्ड, बॅन्जो, झांजपथक, ढोलताशा, नाशिक ढोल, लेझीम, धनगरी ढोल, टाळ-मृदंग या पारंपरिक वाद्यांना मागणी आहे. बॅन्ड, बॅन्जो व झांज-ढोलताशा पथकांचे दर ५० हजारांपासून लाखापर्यंत पोहोचले आहेत.

गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीसाठी वाद्यपथकांना मोठी मागणी असल्याने बुकिंगसाठी सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. महापालिका निवडणूक नुकतीच पार पडल्याने गणेश मंडळे उत्साहात आहेत. यापूर्वी मोठ्या आवाजाच्या साऊंडसिस्टीमुळे पारंपरिक वाद्यांवर संक्रांत आली होती; मात्र गेल्या काही वर्षांत पोलिसांकडून या मोठ्या आवाजाच्या साऊंडसिस्टीमच्या बंदीच्या कठोर अंमलबजावणीमुळे व कारवाईमुळे गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत.

नवव्या व अखेरच्यादिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बॅन्ड, बॅन्जो, झांज, ढोलपथक मिळविणे अवघड झाले आहे. यावर्षी विसर्जनाच्या अखेरच्यादिवशी मोठी मागणी असल्याने बॅन्ड, बॅन्जो, झांजपथकाचे, ढोलताशा पथकाचे दर ५० हजारांपासून लाखापर्यंत पोहोचले आहेत. बॅन्जो व झांजपथके ताशी दहा ते पंधरा हजारांची मागणी करीत आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बॅॅन्जो व झांजपथके आहेत. मिरजेसह कागवाड, सौदत्ती, चिकोडी, जमखंडी, अथणी येथील बॅन्ड पथकांचा लौकिक आहे. केरळी चंडीनृत्य, नाशिक ढोल हा सनईच्या साथीने ढोलवादन व एकाचवेळी ६० ते ७० वादकांचे ढोलताशा वादन मिरवणुकीचे आकर्षण ठरत आहे. नाशिक ढोलसाठी किमान ३० हजार, तर ढोलताशा पथकासाठी लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

गणेशोत्सवात मागणी असल्याने वाद्यपथकांची चांगली कमाई होणार आहे. अनेक मंडळांनी महापालिका निवडणुकीदरम्यान गणेशोत्सवापूर्वी महिनाभर अगोदर वाद्यपथके ठरविली आहेत. स्थानिक वाद्यपथकांची टंचाई असल्याने कर्नाटकातील वाद्यपथकांना पाचारण करण्यात येत आहे. आर्थिक क्षमता कमी असलेल्या मंडळांची धनगरी ढोल, लेझीम, टाळ-मृदंग या किमान १५ ते २० हजार रुपये दर असलेल्या स्वस्त वाद्यांना पसंती आहे.मिरजेत मुली व महिलांची ढोलताशा पथके, मुला-मुलींच्या ढोलताशा पथकांचा गेल्या महिन्याभरापासून गणेशोत्सवासाठी सराव 

ढोल व ताशाची जुगलबंदी असलेल्या ढोलताशा पथकांना मोठी मागणी असल्याने सांगली, मिरजेत स्थानिक वादकांच्या अनेक ढोलताशा पथकांची निर्मिती झाली आहे. गणेशोत्सवात झांजपथक व बॅन्ड व बॅन्जोसाठी ५० हजार ते लाखापर्यंत दर आहेत. ५० ते ७० वादक असलेल्या ढोलताशा पथकांसाठी ताशी २५ हजार रुपये दर आहे. वादकांच्या संख्येवर ढोलताशा पथकाचा दर आहे. एकाचवेळी शेकडो ढोल वाजविणारी ढोलताशा पथके आवाजाबाबत डॉल्बीशी स्पर्धा करतात.

टॅग्स :SangliसांगलीGanpati Utsavगणपती उत्सव