शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या...
2
अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई
3
भाजप शिवसेनेला संपवणार? 'फोडाफोडी'वर एकनाथ शिंदेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले; "आम्ही घाबरत नाही"
4
१० मिनिटांच्या डिलिव्हरीवर गिग वर्कर्सचा आक्षेप; क्विक कॉमर्स कंपन्यांचे धाबे दणाणले, काय आहे मागणी?
5
रोहित शर्माची पत्नीने रितिका सजदेहने मुंबईतील पॉश एरियात घेतला आलिशान फ्लॅट, किंमत किती?
6
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहरातील पेपर केला सोपा; २० जागांवर युतीचे नगरसेवक बिनविरोध
7
फक्त फोन जवळ नेला अन् पैसे उडाले! 'टॅप-टू-पे' वापरताय तर ही बातमी वाचाच; नाहीतर होईल मोठं नुकसान
8
Vijay Hazare Trophy : हार्दिक पांड्याची वादळी खेळी! ‘बडे मियाँ’च्या कॅप्टन्सीत ‘छोटे मियाँ’चा धमाका!
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले, एका झटक्यात चांदी ₹१२,२२५ नं स्वस्त; Gold च्या किंमतीत किती घसरण, पाहा
10
वडिलांना वाचवण्यासाठी लेकीने बिबट्याशी दोन हात केले, उसाच्या तुकड्याने फोडून पळवून लावले
11
'ठरलं होतं, आज याला मारायचंच'; मध्यरात्री प्रियकराला घरात घेतलं अन् झोपेतच पतीचा काटा काढला!
12
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर पाच दिवसांचा 'ब्लॉक'; कुठे, किती तास वाहतूक राहणार बंद? 
13
अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबात कोण-कोण? आता कोणाच्या खांद्यावर असेल ३५,००० कोटींच्या वेदांता समूहाची जबाबदारी
14
Ritual: एखाद्याची खोटी शपथ घेतल्याने ती व्यक्ती खरोखरंच मरते का? जाणून घ्या गंभीर परिणाम 
15
निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, काय झाली चर्चा?
16
Video: "हे चुकीचं आहे रे..."; रोहित शर्मा चिडला, लहान मुलीच्या आईवडिलांना चांगलंच सुनावलं!
17
फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन 
18
BJP MIM Alliance: सत्तेसाठी भाजपाने फक्त एआयएमआयएम नाही, तर दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही सेना, प्रहारची बांधली होती मोट
19
भारतातील १ कप चहाच्या किमतीत व्हेनेझुएलात मिळतंय ३ लिटर पेट्रोल; जाणून घ्या किती आहेत दर?
20
"निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांनी अर्धा किलोच बेदाणा सौद्यात बघायचा!

By admin | Updated: June 22, 2016 00:10 IST

बैठकीत तोडगा : जास्त उधळला तर चोप मिळणार

तासगाव : बेदाणा उधळणीविरोधात तोडगा काढण्यासाठी मंगळवारी तासगाव बाजार समितीत बाजार समिती, व्यापारी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची बैठक झाली. यावेळी अर्धा किलोच बेदाणा सौद्यामध्ये व्यापाऱ्यांनी पहावा. त्याच्यापेक्षा जास्त बेदाणा उधळला तर व्यापाऱ्यांना चोप देऊन वरील नुकसान त्यांच्याकडून वसूल केले जाणार असल्याचा तोडगा बाजार समिती व्यापारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत मंगळवारी निघाला. यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे व व्यापारी असोसिएशनचे व्यापारी उपस्थित होते. दुपारी दीड वाजता तासगाव बाजार समितीत ही बैठक सुरू झाली. सांगली जिल्ह्यात तासगाव, मिरज, पलूस, जत, कवठेमहांकाळ, वाळवा आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष पीक घेतले जाते. पिकवलेल्या द्राक्षापैकी ४० ते ५० टक्के द्राक्षापासून बेदाणा केला जातो. तासगाव ही बेदाण्याची मोठी बाजारपेठ आहे. मात्र मूठभर व्यापारी आणि दलालांच्या ताब्यात हा व्यवसाय आहे. दर पाडणे, दर वाढवणे हे व्यापारी दलाल करतात. बेदाणा मोठ्याप्रमाणात उधळला जातो. त्याचे नुकसान शेतकऱ्यांनाच सोसावे लागते. ते बंद व्हावे, अशी मागणी महेश खराडे यांनी केली.व यापुढे अर्धा किलो बेदाणाच व्यापाऱ्यांनी पहावा. त्यापेक्षा जास्त उधळला तर व्यापाऱ्यांना चोपून त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे नुकसान वसूल करू, असा इशारा त्यांनी दिला. तसेच शीतगृहे आॅनलाईन करा, वेळेत पेमेंट करा, बेदाण्याला हमीभाव द्या, शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करा, बेदाण्याचा खप वाढावा यासाठी जाहिरात करावी आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. मात्र सभापती अविनाश पाटील व व्यापारी असोशिएशनने पत्रक काढून तशा सूचना व्यापाऱ्यांना देण्यात येतील, असे सांगितले. यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष अशोक खाडे, भुजंगराव पाटील, गुलाबराव यादव, सचिन पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)बिलांसाठी होणार तीन बाजार समित्यांची बैठकशेतकऱ्यांना बेदाण्याचे पेमेंट वेळेवर दिले जात नाही. २३ दिवसात पेमेंट देणे बंधनकारक असताना ४० ते ५० दिवस पेमेंट मिळत नाही. बेदाणा बॉक्सचे पैसे शेतकऱ्यांना द्या, शीतगृहे आॅनलाईन करा, उधळण थाबवा, वेळेत पेमेंट करा, बेदाण्याला हमीभाव द्या, शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करा, बेदाणा खप वाढवा यासाठी जाहिरात करावी, आदी प्रमुख मागण्यांसाठी तासगाव, सांगली व पंढरपूर या तीन बाजार समित्या व व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात २३ दिवसात पेमेंटची मागणी व अन्य मागण्यांवर चर्चा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.