शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पुरोगामी संघटनांची मशाल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 11:52 IST

सांगली : विचारवंतांच्या हत्याप्रकरणी हल्लेखोरांना पकडण्यात शासनाला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ सोमवारी पुरोगामी संघटनांनी सांगलीत मशाल फेरी काढली.पुरोगामी कार्यकर्ते सायंकाळी ७ वाजता सांगलीमध्ये महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकत्रित झाले होते.

ठळक मुद्देसांगली शहरात शासनाचा निषेध कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी एकाचदिवशी देशभर निषेध आंदोलन

सांगली : विचारवंतांच्या हत्याप्रकरणी हल्लेखोरांना पकडण्यात शासनाला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ सोमवारी पुरोगामी संघटनांनी सांगलीत मशाल फेरी काढली. पुरोगामी कार्यकर्ते सायंकाळी ७ वाजता सांगलीमध्ये महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकत्रित झाले होते.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते कॉ. गोविंद पानसरे, लेखक प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हल्लेखोरांना पकडण्यात सरकारला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. पुरोगामी कार्यकर्ते सायंकाळी ७ वाजता सांगलीमध्ये महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकत्रित झाले होते. तेथे मशाल प्रज्वलित करण्यात आली.

शहरातील प्रमुख मार्गावरुन मशाल फेरी काढण्यात आली. यावेळी विचारवंतांच्या खुनाचा तपास योग्य पद्धतीने न करणाºया केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. घोषणाबाजी करण्यात आली. दिल्ली येथे १८ सप्टेंबरला झालेल्या विविध जनसंघटनांच्या मेळाव्यामध्ये एकाचदिवशी देशभर असे निषेध आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून सांगली शहरात हे आंदोलन करण्यात आले.

यामध्ये कॉ. उमेश देशमुख, अंनिसचे राहुल थोरात, ज्योती आदाटे, वीज कर्मचारी संघटनेचे रमेश सहस्रबुध्दे, अ‍ॅड. सुधीर गावडे, लाल निशाण पक्षाचे अमित ठकार, अ‍ॅड. राहुल जाधव, बांधकाम कामगार संघटनेचे इब्राहीम पेंढारी, राजू पाटील, नंदकुमार चौगुले, करीम मुजावर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीChakka jamचक्काजाम