संख : राज्य शासनाने मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांचे नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे शुक्रवार दि. ४ जून रोजी धरणे आंदोलन करणार आहेत. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी प्रशांत आवटी यांना जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी दिले.
निवेदनात म्हटले की, राज्य सरकारने आरक्षण शिवाय सेवाज्येष्ठतेनुसार मागासवर्गीय पदोन्नतीतील सर्व रिक्त जागा भरण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असून हा निर्णय घटनाबाह्य आहे. दि. ७ मे २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाचा अन्यायकारक झालेला निर्णय सरकारने मागे घ्यावा आदी मागण्यांसाठी शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, जत तालुका विधानसभा क्षेत्राध्यक्ष नारायण कामत, बहुजन विद्यार्थी परिषदेचे आघाडी तालुकाध्यक्ष सुभाष दादा कांबळे, बादल कांबळे आदी उपस्थित होते.