शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पलूस-कडेगाव मतदारसंघात टोलनाका होऊ देणार नाही -: विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:48 IST

विजापूर-गुहागर महामार्गावर कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी ते शिवणी फाटादरम्यान होणाऱ्या टोलनाक्याला तीव्र विरोध करीत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. कोणत्याही

ठळक मुद्देविधानसभेत इशारा; येवलेवाडी टोलनाक्यास विरोध

प्रताप महाडिक ।कडेगाव : विजापूर-गुहागर महामार्गावर कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी ते शिवणी फाटादरम्यान होणाऱ्या टोलनाक्याला तीव्र विरोध करीत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. कोणत्याही परिस्थितीत पलूस कडेगाव मतदारसंघात टोलनाका होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

विश्वजित कदम म्हणाले, दोन वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने गुहागर-विजापूर (१६६ ई) हा २८३..०८० किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला. सध्या या महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गामुळे येथील दुष्काळी भाग कोकण व कर्नाटकशी जोडला जाणार आहे. रस्ताही चांगल्या दर्जाचा होणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे.

परंतु या महामार्गावर शिवणी फाटा ते येवलेवाडीदरम्यान टोलनाका उभारण्याबाबत हालचाली सुरु आहेत. यासाठी लागणाºया निधीची तरतूद ही महामार्गाच्या निधीतच केलेली आहे. त्यामुळे कडेगाव ते विटा यादरम्यान सध्या महामार्ग बांधणीचे काम करणारी एजन्सीच हा टोलनाका उभारणार आहे. त्यासाठी येथे भूसंपादनही करण्यात येत आहे. त्यामुळे या महामार्गावरुन जाणाºया प्रत्येक चारचाकी वाहनधारकांना येथे टोल द्यावा लागणार आहे. तालुक्यातील स्थानिक नागरिकांना या महामार्गावरुन सतत ये-जा करावी लागणार असल्याने त्यांनाही टोलनाक्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळेच परिसरातीला गावांमधून नागरिकांचा येथे टोलनाका उभारण्यासाठी तीव्र विरोध आहे.

कडेगाव ते विटा रस्त्यावर वीस किलोमीटरच्या परिघात विटा नगरपालिका, कडेगाव नगरपंचायत व चाळीस ते पन्नास खेडी येतात. लाखो लोक या टोलनाक्याने प्रभावित होणार आहेत.शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडकडेगाव ते विटा या मार्गावर दररोज हजारो व्यावसायिक, शेतकरी, नोकरदार स्वत:च्या चारचाकी वाहनाने ये-जा करतात. या मार्गावरून बहुतांश शेतकºयांचा फळे व भाजीपाला वाहनांद्वारे कºहाडकडे जातो. टोलनाक्यामुळे या सर्व वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हा अन्यायी टोलनाका पलूस कडेगाव मतदार संघात होऊ देणार नाही, असा इशारा कदम यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीroad transportरस्ते वाहतूक