शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कडक उन्हातही वन्यप्राण्यांची तहान भागणार, सांगलीतील सागरेश्वर अभयारण्यात ३२ पाणवठ्यांची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 20:02 IST

सध्या तापमान ३७ ते ३९ अंशांवर पोहोचले

नितीन पाटीलपलूस : सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत असलेल्या सागरेश्वर अभयारण्याच्या वनक्षेत्रात वन्यजीव, प्राणी आणि पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी पाणवठ्यांची उभारणी करण्यात आली आहे. पलूस तालुका आणि सागरेश्वर परिसरात सध्या उन्हाळ्याची कडाक्याची दाहकता वाढली आहे. सध्या तापमान ३७ ते ३९ अंशांवर पोहोचले आहे. अशा पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी सागरेश्वर अभयारण्याच्या प्रशासनाने परिसरात सुमारे ३२ कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. त्यात नियमितपणे पाणी सोडले जात असल्याने कडक उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची तहान भागवली जात आहे.दिवसेंदिवस उन्हाळ्याची दाहकता आणि तापमान वाढत चालले आहे, तशी अभयारण्य आणि वनक्षेत्र परिसरात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना आणि पक्ष्यांना पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून १०.३ किलोमीटर क्षेत्रात तब्बल ३२ कृत्रिम पाणवठे उभारण्यात आले आहेत. या पाणवठ्यांवर काही ठिकाणी पाइपलाइनद्वारे तर अनेक ठिकाणी टँकरद्वारे वन्यजीवांना मुबलक पाणी पुरवले जात आहे.

या उपक्रमामुळे या परिसरातील हरण, काळवीट, तरस, बिबटे, गवे, ससे, माकडे तसेच इतर लहान-मोठ्या वन्यप्राण्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील तीन महिन्यांपासून नियमित पाणवठ्यात पाणीपुरवठा केला जात आहे. संवर्धनाबरोबरच वन्यजीवांचे संरक्षण, प्राणी आणि पक्ष्यांचे संगोपन आणि त्यांची सुरक्षा हेच आमचे काम आणि कर्तव्य आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे वनसंपदा आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत. - बालाजी चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, सागरेश्वर अभयारण्य

English
हिंदी सारांश
Web Title : Sagreshwar Sanctuary Quenches Wildlife's Thirst with 32 Waterholes Amidst Scorching Heat

Web Summary : To combat rising temperatures, Sagreshwar Sanctuary created 32 artificial waterholes across 10.3 kilometers, providing crucial relief for animals like deer, leopards, and birds. Tankers and pipelines ensure a consistent water supply, aiding wildlife conservation during the intense summer heat.