शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला कंटाळलो, कर्नाटकात सामावून घ्या; सांगली जिल्ह्यातील वंचित गावांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना साकडे 

By संतोष भिसे | Updated: March 8, 2024 16:52 IST

दरीबडची : दुष्काळग्रस्त जत पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावातील रहिवाशांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना पाण्यासाठी साकडे घातले आहे. ...

दरीबडची : दुष्काळग्रस्त जत पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावातील रहिवाशांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना पाण्यासाठी साकडे घातले आहे. पाणी द्या आणि आम्हाला कर्नाटकात सामावून घ्या अशी हाक दिली आहे. महाराष्ट्र सरकार आम्हाला पाणी देत नाही. पाणी मागून कंटाळलो आहोत. आता आम्हाला कर्नाटकात घ्या अशा आशयाचे फलक घेऊन जतच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यक्रमात लक्ष वेधून घेतले. जतच्या सीमेवरील कोट्टलगी (ता. अथणी) येथे अम्माजेश्वरी उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री सिध्दरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते झाले. कृष्णा नदीतून पाणी घेणारी ही ११७६ कोटींची योजना आहे. या कार्यक्रमात जत पूर्व भागातील मुचंडी, सिध्दनाथ, दरीबडची, उमदी, सुसलाद, बालगाव, हळ्ळी, अंकलगी, तिकोंडी, भिवर्गी, करजगीसह २५ ते ३० गावांतील दुष्काळग्रस्त फलक घेऊन गेले होते. त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पाण्यासाठी साकडे घातले.अम्माजेश्वरी जलसिंचन योजनेद्वारे जत पूर्व भागातील गुड्डापूर, मुचंडी, दरीबडची अशा ४२ गावांतील ३० हजार हेक्टर शेतीक्षेत्र कायमस्वरूपी ओलिताखाली येऊ शकते, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो असे या शेतकऱ्यांनी सांगितले.  महाराष्ट्राचे सत्ताधारी फक्त कोरड्या घोषणा देण्यापलीकडे काहीही करत नसल्याने जत तालुका पाण्याविना होरपळत आहे. त्यामुळे कर्नाटकनेच आम्हाला आश्रय द्यावा असेही शेतकरी म्हणाले.मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी सीमावर्ती भागातील गावांना पाणी देण्यासाठी कर्नाटक सरकार सकारात्मक आहे असे भाषणात सांगितले. कन्नड भाषिक गावांच्या विकासासाठी कर्नाटक शासनाच्या महामंडळातून निधी देऊ. कन्नड भाषेत शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण व उद्योगामध्ये आरक्षण देऊ अशा घोषणाही सिद्धरामय्या यांनी केल्या. यावेळी बाबू माळी, संजय काटे, आप्पासाहेब माळी, रायगोंडा राचगोंडा यांच्यासह २५ ते ३० गावांतील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकWaterपाणी