शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

वाळव्यात राष्ट्रवादीवर चिंतनाची वेळ

By admin | Updated: February 23, 2017 22:57 IST

चुरशीच्या लढती : विकास आघाडीच्या जागांमध्ये वाढ

युनूस शेख--इस्लामपूर -वाळवा तालुक्यातील पंचायत समितीवरील सत्तेचा झेंडा कायम ठेवल्याचे समाधान असले तरी, जिल्हा परिषदेच्या २ आणि पं. स. मधील त्यांच्या ३ जागा कमी झाल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर चिंतनाची वेळ आली आहे. बागणीतील हायव्होल्टेज लढतीत राष्ट्रवादीचे बंडखोर संभाजी कचरे आणि कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांच्यातील लक्षवेधी लढतीत राष्ट्रवादीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. बागणीतील गाजलेल्या लढतीत कचरे यांनी १२० मतांनी सागर खोत यांच्यावर मात केली. कचरे यांचे १४०० पर्यंतचे गेलेले मताधिक्य शिगाव आणि बागणीच्या मतदानातून तोडत सागर खोत यांनी ते केवळ ९१ मतांवर आणून ठेवले होते. त्यामुळे मतमोजणी केंद्रात एकच खळबळ उडाली होती. टपाली मताच्या मोजणीनंतर कचरे विजयी झाले. फेरमतमोजणीतही हेच मताधिक्य कायम राहिले.कासेगाव जि. प. गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार संगीता संभाजीराव पाटील या ६ हजार ५६७ इतक्या सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्या, तर वाळव्यातून विकास आघाडीच्या सुषमा अरुण नायकवडी यांनी ४ हजार २६७ च्या मताधिक्याने विजय नोंदवला. पंचायत समितीसाठी देवराज पाटील यांनी कासेगावमधून ३ हजार २६ मतांचे अधिक्य घेतले. नेर्ले गणातील राजश्री फसाले यांनी २५९६ असे मताधिक्य घेतले. रेठरेधरणमधून शंकर चव्हाण यांनी २३२९ चे, तर येलूरमधून राहुल महाडिक यांनी २००९ मतांचे अधिक्य घेत निवडणूक जिंकली.कामेरी पं. स. गणातून विकास आघाडीच्या सविता पाटील या अवघ्या ५१ मतांनी विजयी झाल्या. चिकुर्डे गणातून काँग्रेसच्या सुप्रिया भोसले या १०६ मतांनी, तर बावची गणातून विकास आघाडीचे आशिष काळे १५० मतांनी विजयी झाले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतून विजयी उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्यावरुन ही निवडणूक अत्यंत चुरशीने झाल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीने रेठरेहरणाक्ष, कासेगाव, वाटेगाव, चिकुर्डे व बावची गटातून विजय नोंदवले, तर विकास आघाडीने पेठ, येलूर, वाळवा, कामेरी गटातून विजयाची नोंद केली. बोरगावमधून पुन्हा काँग्रेसच्या जितेंद्र पाटील यांनी तिसऱ्यांदा बाजी मारताना राष्ट्रवादीला जेरीस आणले.या संपूर्ण निवडणुकीतून क्रॉस व्होटिंगचा वापर मतदारांनी खुबीने केल्याचे स्पष्ट झाले आहे. चिकुर्डेमधून काट्याच्या लढतीत राष्ट्रवादीच्या संजीव पाटील यांनी शिवसेनेच्या अभिजित पाटील यांच्यावर अवघ्या ५८४ मतांनी मात केली.या निवडणुकीत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांची राष्ट्रवादीसाठी, तर कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, वैभव नायकवडी यांची विकास आघाडीकडून प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र या निवडणुकीमध्ये मतदारांनी कोणालाही एकतर्फी वर्चस्व गाजवू दिले नाही.येलूरमधून राहुल महाडिक यांनी विजय मिळविल्यानंतर गुरुवारी त्यांच्या समर्थकांनी त्यांना खांद्यावर घेत गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.