शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिकीकरणामुळे वडार समाजावर भांगलणीची वेळ, शेतात काम करून उदरनिर्वाह सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 16:31 IST

दिलीप मोहिते कुरळप : देश प्रगतीपथावर जात असल्याचे एकीकडे समाधान वाटत असले, तरी यांत्रिकीकरणामुळे कुरळपसह परिसरातील वडार व राठोड ...

दिलीप मोहितेकुरळप : देश प्रगतीपथावर जात असल्याचे एकीकडे समाधान वाटत असले, तरी यांत्रिकीकरणामुळे कुरळपसह परिसरातील वडार व राठोड समाजातील लोकांना काम मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जेसीबी, पोकलेनमुळे विहीर खोदाई आठवड्यात होत असल्यामुळे वडार समाजातील लोकांच्या हातातील खोरी, टिकाव, पाट्या यासारखी हत्यारे जाऊन हातात खुरपी घेऊन शेतामध्ये भांगलणी करून आपला उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे.पूर्वी विहिरी खोदणे, गटारी काढणे, शेतातील पाइपलाइन काढणे यासारखी अवजड कामे वडार समाजाकडून करून घेतली जात होती. एक विहीर खोदण्यासाठी दहा ते पंधरा लोक लागायचे. हे काम एक ते दोन महिने सुरू असायचे. यामुळे हातात चार पैसे आल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालून मुलांचे शिक्षणही व्यवस्थित होत होते. मात्र, सध्याच्या आधुनिक युगात जेसीबी, पोकलेन सारख्या मशिनरी आल्याने दिवसाचे काम तासात होऊ लागले. तसेच एक विहीर आठवड्यात पूर्ण होत आहे. यामुळे वेळेची व पैशांची बचत होत असल्याने जेसीबी, पोकलेनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि विहिरी काढण्यापासून ते नाले काढण्यापर्यंत या यांत्रिकी मशीनचा सर्रास वापर होऊ लागला. यामुळे वडार समाजातील लोकांच्या हातातील खोरी, टिकाव, पाट्या सारखी हत्यारे जाऊन हातात खुरपी घेऊन शेतामध्ये भांगलणी करून आपला उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. मात्र, शेतीच्या कामातून मिळणाऱ्या पैशातून आमचा घरसंसार, मुलांचे शिक्षण व इतर खर्च भागत नसल्याची खंत कुरळप येथील अशोक वडार यांनी बोलून दाखवली. तर नवीन आलेल्या पाइप लिकेज मशिनरीमुळे मागील दोन-तीन वर्षांपासून शेतातील पाइपलाइन लिकेजचे काम मिळणेसुद्धा बंद झाले आहे.

जेसीबी वडार समाजाच्या मुळावरजेसीबीसारखे यांत्रिकी मशीन हे वडार समाजाच्या मुळावर आले आहे. या मशिनरीमुळे आमची रोजंदारी बंद झाली. त्यातच पूर्वीपासून खोदकामासारखी अवजड कामे केल्यामुळे आता शेतातील सरीत बसून भांगलणे अवघड होत आहे. शिवाय यातून मिळणाऱ्या पैशांतून आमच्या घरचा खर्च व मुलांचे शिक्षण होत नसल्याने वडार समाजावर आर्थिक संकटाचा डोंगर वाढला आहे. - अशोक वडार

टॅग्स :Sangliसांगली