शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मोदींचा हिटलरशाही कारभार संपविण्याची हीच योग्य वेळ: उल्का महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:09 IST

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हिटलरशाहीप्रमाणे चालू आहे. आजपर्यंतच्या सर्व राजवटीतील सर्वात धोकादायक, संविधानविरोधी, सामाजिक वीण उसवणारी ...

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हिटलरशाहीप्रमाणे चालू आहे. आजपर्यंतच्या सर्व राजवटीतील सर्वात धोकादायक, संविधानविरोधी, सामाजिक वीण उसवणारी राजवट भाजपच्या रूपाने सत्तेच्या केंद्रस्थानी आहे, अशी टीका डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेत्या उल्का महाजन यांनी सांगलीत बुधवारी केली. भांडवलशाही सरकारला पायउतार करण्याची हीच वेळ आहे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.सांगलीतील सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी पक्ष व संघटनांच्यावतीने बुधवारी ‘श्रमिकांचा जाहीरनामा’ परिषद घेण्यात आली, यावेळी उल्का महाजन बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कॉ. शंकर पुजारी होते. यावेळी सुभाष लोमटे, मुक्ता श्रीवास्तव, डॉ. अभिजित मोरे, चंद्रकांत यादव, डॉ. बाबूराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, कॉ. रमेश सहस्रबुध्दे, अ‍ॅड्. के. डी. शिंदे, सुमन पुजारी, अमोल पवार, धनराज कांबळे आदी उपस्थित होते.उल्का महाजन म्हणाल्या की, संविधान जाळणाऱ्यांना, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिकांची हत्या करणाऱ्यांना या देशात अटक होत नाही, कोणतीही शिक्षा होत नाही. पण, संविधान वाचविण्यासाठी कोणी रस्त्यावर उतरले, त्या मुद्द्यावर आवाज उठविला, तर त्याला देशद्रोही ठरविण्यात येते. त्याला तात्काळ अटक करून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून होत आहे. अशा सरकारला पायउतार करण्याची गरज आहे. एकीकडे सामाजिक मांडणी करत असल्याचे ढोंग करायचे व दुसरीकडे देशातील आर्थिक नाड्या हातात ठेवायच्या, या धारेतील भाजपला त्यांची जागा दाखविण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे.डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, सैनिकांच्या हल्ल्याचे, जवानांच्या बलिदानाचे भांडवल करून त्याचा प्रचारासाठी वापर करणाºया भाजप सरकारचा लोकांच्या प्रश्नांशी संबंध नाही. जाहिरातबाजी आणि भाषणबाजी यावरच लोकांना भुलवले जात आहे.अभिजित मोरे म्हणाले, ‘मन की बात नको, काम की बात’ हवी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदी काहीच बोलत नाहीत. खासगी रुग्णालयांतील बाजार थांबविण्यासाठी कायदे हवेत. या मागण्यांचा ज्यांच्या जाहीरनाम्यात उल्लेख असेल, त्यांनाच मतदान करा.शंकर पुजारी म्हणाले, ही लढाई पक्षाची नसून सर्वसामान्य जनतेची आहे. चंद्रकांत यादव म्हणाले, नातीगोती, हितसंबंध व जातीपातीवर निवडणुका होत आहेत. सुभाष लोमटे म्हणाले, कष्टकºयांसाठी अनेक कायदे होतात. पण, त्यांची कधीच अंमलबजावणी होत नाही.कॉ. धनाजी गुरव यांनी जाहीरनाम्याबद्दलची संकल्पना सांगितली.