शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

तीस कोटी निधीचे आव्हान कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:19 IST

सांगली : राज्य शासनाने महापालिकेला शंभर कोटींचा निधी देणार असल्याचे जाहीर केले असले तरी, प्रत्यक्षात नगरोत्थान योजनेतून ७० कोटी ...

सांगली : राज्य शासनाने महापालिकेला शंभर कोटींचा निधी देणार असल्याचे जाहीर केले असले तरी, प्रत्यक्षात नगरोत्थान योजनेतून ७० कोटी रुपयेच मिळणार आहेत. उर्वरित ३० कोटी रुपयांची जुळवाजुळव महापालिकेलाच करावी लागणार आहे. सध्याची आर्थिक स्थिती पाहता, हा निधी कसा उभारणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. दोन-चार लाखांची कामेही पैशाअभावी थांबली आहेत. त्यात सत्ताधारी भाजपने हा निधी शासनाकडून आणणार असल्याचे सांगितले असले तरी, जादा निधी मिळण्याविषयी आज तरी साशंकता आहे.महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटींचे बक्षीस जाहीर केले. त्यानुसार महापालिकेने विकास कामांचे प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविले. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला. या प्रस्तावात १७८ रस्ते, ६९ गटारी, १० इमारतींसह ड्रेनेज व पाणीपुरवठ्याच्या वाहिन्यांचा समावेश आहे. स्थायी समितीनेही विशेष सभा घेऊन या कामांच्या निविदा काढण्याचा ठराव केला आहे. मंगळवारी अथवा बुधवारी निविदा प्रसिद्ध होईल. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी किमान निविदा प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.महापालिकेला शासनाने शंभर कोटींचा निधी जाहीर केला असला तरी, प्रत्यक्षात ७० कोटी रुपयेच येणार आहेत. नगरोत्थान योजनेतून शासनाने हा निधी दिला आहे. या योजनेच्या निकषानुसार शासन ७० टक्के व महापालिकेचा हिस्सा ३० टक्के आहे. त्यामुळे महापालिकेला ३० कोटी रुपयांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. भाजप सत्तेत आल्यापासून विकास कामांना ब्रेक लागला आहे. प्रभागातील छोटी-मोठी कामे पैशाअभावी थांबली आहेत. प्रशासनाकडून प्रत्येक फायलीवर आर्थिक तरतुदीचे कारण दिले जात आहे.महापालिकेवर : बोजा वाढणारभाजपचे पदाधिकारी व प्रशासन ३० कोटींचा निधी शासनाकडून मिळणार असल्याचे सांगत आहेत. तसा प्रस्तावही ते शासनाकडे पाठविणार आहेत. पण नगरोत्थान योजनेतून हा निधी मिळणार नाही. त्यासाठी विशेष निधी अथवा १४ व्या वित्त आयोगातून तरतूद करावी लागणार आहे. त्यासाठी शासनाची मंजुरी गरजेची आहे. सांगली महापालिकेला हा निधी दिल्यास राज्यातील इतर महापालिकाही शासनाकडे शंभर टक्के निधीची मागणी करू शकतात. त्यामुळे शासनाच्या अडचणी वाढणार आहेत. भविष्यात शासनाने अतिरिक्त निधी न दिल्यास हा बोजा महापालिकेलाच सहन करावा लागेल.