शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ‘वाघ’च गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2016 12:13 AM

चांदोलीत २५ ठिकाणी प्राणी गणना : दुर्मिळ प्राण्यांचा समावेश; बिबट्या, गेळा, सांबर आढळले

वारणावती : चांदोली राष्ट्रीय उद्यानातील १५ ते २२ मे दरम्यान २५ ठिकाणच्या पाणवठ्यावरील व ट्रान्झीट लाईन व मांसभक्ष्यी प्राण्यांच्या खुणा या तीन पद्धतीने आठ दिवसांची प्राणीगणना पूर्ण झाली आहे. बिबट्या, गेळा, सांबर, चौशिंगा, रानकुत्रा, रानमांजर, शेखरू यांचे अस्तित्व आढळून आले. गतवर्षी वाघांचे अस्तित्व आढळले होते. मात्र यावर्षीच्या गणनेत वाघांचे अस्तित्वच आढळून आलेले नाही. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघच नसल्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ ३६७.१७ चौ.मी. आहे. पश्चिम घाटातील सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य व सांगली जिल्ह्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिकरित्या निर्माण झालेले जंगल निमसदाहरित व दुर्गम डोंगराळ भागातील घनदाट जंगलामध्ये विविध प्रकारची जैवविविधता निर्माण झालेली आहे. यामध्ये २८ जातींचे सस्तन प्राणी, २७५ पक्ष्यांच्या प्रजाती, ४२ जातींचे उभयचर प्राणी, १२५ जातींची फुलपाखरे, ५८ सरपटणारे प्राणी आढळून येतात. निसर्गात राहणारा प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून असतो. याच जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघांचे अस्तित्व असल्याने केंद्राने या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला ५ जानेवारी २०१० ला मान्यता दिली आहे. चांदोली अभयारण्य नैसर्गिकरित्या निर्माण झालेले असल्याने ते निर्मनुष्य आहे. त्यामुळे येथील प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे व दुर्मिळ प्राण्यांच्या व वाघांच्या अस्तित्वामुळे चांदोली अभयारण्याचा नावलौकिक वाढतच आहे.ट्रान्झीट लाईन पद्धतीने केलेल्या प्राणी गणनेत अभयारण्याचे चांदोली-२, झोळंबी, बेती, निवळे सां., लोटीव, मळे, कोळणे, पाथरपुंज, सोनार्ली, आळोली, आंबोळे, चांदोली खुर्द, रुंदीब, निवळे को., ढोकाळे, चांदेल, सिद्धेश्वर अशा १९ भागात ट्रान्झीट लाईन पद्धतीने प्राणी गणना करण्यात आली. यामध्ये प्रत्येक भागात एक वनपाल, एक वनरक्षक, एक वनमजूर अशा तिघांचे एक पथक अशा १९ पथकांद्वारे प्राण्यांची गणना करण्यात आली आहे. गतवर्षीच्या गणनेत वाघांच्या अस्तित्वाच्या खुणा आढळून आल्या होत्या. मात्र यावर्षीच्या गणनेत वाघांच्या अस्तित्वाच्या काहीच खुणा आढळून आल्या नाहीत. मात्र इतरवेळी जंगल फिरताना अभयारण्याच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वाघांच्या अस्तित्वाच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्याची नोंद वेगळी केली जाते, असे अभयारण्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. या सर्व गणनेचा एकत्रित आराखडा तयार करून आकडेवारी वरिष्ठ कार्यालयाला कळविली जाते व तेथूनच आकडेवारी निश्चित केली जाते. (वार्ताहर)प्राणी गणना : तीन टप्प्यात नियोजनचांदोली राष्ट्रीय उद्यानातील प्राणी गणना १५ मे ते २२ मेअखेर २५ ठिकाणच्या पाणवठ्यावरील व ट्रान्झीट लाईन व मांसभक्ष्यी प्राण्यांच्या खुणा या तीन पद्धतीने आठ दिवसांत करण्यात आली. १५ ते १७ मे : ट्रान्झीट लाईन व १८ ते २० मे : मांसभक्ष्यी प्राण्यांच्या पाऊलखुणा, झाडावरील ओरखडे, पाणवठ्यातील पायवाटा व प्राण्यांची विष्ठा, तसेच विविध प्राण्यांचे आवाज यांचा शोध घेऊन त्यांची गणना करण्यात आली. २१ ते २२ मे बौद्ध पौर्णिमेला पाणवठ्यावरील लपनगृह व मचाणावर थांबून चांदण्या रात्रीची ही गणना करण्यात आली. या २५ ठिकाणच्या गणनेत जवळपास ७५ टक्के सहभागी झाले होते.