शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा कारागृहामध्ये फेकला गांजाचा बटवा, तिघांवर गुन्हा दाखल

By शरद जाधव | Updated: November 18, 2023 15:59 IST

गांजा फेकणाऱ्यांचा शोध सुरू

सांगली : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा कारागृहात बाहेरच्या बाजूने गांजा फेकण्यात आल्याचा प्रकार घडला. यावेळी गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानुसार बाहेरून गांजा असलेला बटवा फेकणारा हरिष माहिते तसेच कारागृहातील बंदी सोहेल दिलावर शेख आणि तुषार महेश भिसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृह प्रशासनाने सांगली शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा कारागृहात गांजा सदृश्य पाला आणि दगड असलेला लहान बटवा फेकण्यात आला. नेमका हा प्रकार झाला त्यावेळी कर्मचारी गस्तीवर होते. बटवा उचलत असतानाच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारागृहामधील असलेले तट क्रमांक २ आणि ३ च्या मधोमध असलेल्या विभक्त कोठडीच्या समोर बंदी सोहेलचा मित्र हरिष मोहिते याने आरोपी सोहेल शेख आणि तुषार भिसे यांच्याकरिता गांजा सदृश्य पाला व बटवा कारागृहामध्ये फेकला. याबाबत कारागृह शिपाई माधव रामराव सोमवंशी यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीjailतुरुंगCrime Newsगुन्हेगारी