शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

..यातूनच माणूस होतो संपन्न, सुधा मूर्तींनी सांगलीत वाचकांशी साधला दिलखुलास संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 12:04 IST

सुधा मूर्ती यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिली विद्यार्थिनी आणि टेल्कोतील पहिली महिला इंजिनीअर ते प्रख्यात लेखिका हा प्रवास उलगडला.

सांगली : आईच्या सक्त भूमिकेमुळे मला वाचन, लेखनाची आवड निर्माण झाली. लेखकाने निष्ठेने आणि सत्य लिहिले पाहिजे. जगण्याची आशा निर्माण करणारे लेखन असावे. मैत्री, वाचन, मनन, संवादातूनच माणून संपन्न होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी केले. सांगलीत त्यांनी वाचकांशी दिलखुलास संवाद साधला.‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात अनुवादक लीना सोहनी यांनी त्यांची मुलाखत घेतली. योजना यादव यांनी निवेदन केले. साहिल मेहता यांनी स्वागत केले. सुधा मूर्ती यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिली विद्यार्थिनी आणि टेल्कोतील पहिली महिला इंजिनीअर ते प्रख्यात लेखिका हा प्रवास उलगडला.त्या म्हणाल्या की, आईच्या सक्त भूमिकेमुळे वाचन, लेखनाची आवड निर्माण झाली. समाजात वावरताना जे अनुभवले, पाहिले, तेच लिहिले. तुम्हीही कधीतरी अनुभवलेले असते, फक्त त्या-त्यावेळी लिहीत चला, तुम्हीही लिहू शकता. दहा पुस्तके वाचाल, तेव्हा एक परिच्छेद तुम्ही लिहू शकाल. लेखकाने निष्ठेने आणि सत्य लिहावे. लेखनात जगण्याची आशा निर्माण करण्याची शक्ती असते. आशा हेच आयुष्य आहे. कष्ट आणि कष्टातून बाहेर येण्याचे सूत्र मी मांडते. त्यामुळे वाचकांचे प्रेम मिळाले आहे.टेल्को कंपनीत मुलगी आणि मशीन विरुद्धार्थी शब्द होते, तेथेच आज कारनिर्मितीसाठी २०० मुलींचे स्वतंत्र युनिट असल्याचे सांगतानाच, अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षण, नोकरीतील वाटेला आलेली अवहेलना, खडतर परिस्थितीतून काढलेला मार्ग या साऱ्याचे अनुभवही त्यांनी वाचकांसमोर उलघडला. मुलांना ॲडजेस्टमेंट शिकवा, त्यांच्या डोक्यात हवा जाऊ देऊ नका, असा सल्ला पालकांना देत, आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रापंचिक गुंत्यातून मुक्त व्हाल, तर आनंदी जीवन जगाल, असे कानमंत्रही त्यांनी ज्येष्ठांना दिला.

व्हॉट्सॲपचा वापर कामापुरताचसध्या पिढी शिक्षण खेळ, वाचन यापासून दूर चालली आहे. ती व्हॉट्सॲपमध्ये अडकत आहे, हे चुकीचे आहे. व्हॉट्सॲपचा वापर कामापुरताच करा, त्यात अडकून पडू नका, असा सल्लाही सुधा मूर्ती यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीSudha Murtyसुधा मूर्ती