शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

जबरी चोरी करणाऱ्या देवराष्ट्रेतील तिघांना अटक

By घनशाम नवाथे | Updated: January 4, 2025 21:19 IST

कडेपूरच्या महिलेचाही समावेश : गुन्हे अन्वेषणकडून पाच लाखांचे दागिने हस्तगत

घनशाम नवाथे/ लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कडेपूर येथे शेतात चाकूच्या धाकाने महिलांचे दागिने लुटणाऱ्या आणि पेठ (ता. वाळवा), कार्वे, देवनगर (ता. खानापूर) येथे जबरी चोरी व चेन स्नॅचिंग करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केली. संशयित अभिषेक जगन्नाथ जाधव (वय २३), निरंजन बळवंत कुरळे (वय २२), सौरभ महादेव इंगवले (वय २२, तिघे रा. देवराष्ट्रे, ता. कडेगाव) व सुलताना बालेखान मुलाणी (वय ४३, रा. कडेपूर, ता. कडेगाव) या चौघांना अटक करून ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

लवंग मळा, कडेपूर येथे शेतात काम करणाऱ्या दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने भरदिवसा काढून नेल्याचा प्रकार दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी घडला होता. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांना याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक चोरट्यांचा माग काढत होते. तेव्हा पथकातील हणमंत लोहार व प्रमोद साखरपे यांना विटा ते कडेपूर रस्त्यावरून तिघे संशयित दुचाकीवरून चोरीचे सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचला. तिघे संशयित आल्यानंतर त्यांना थांबवून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर अभिषेकच्या खिशात सोन्याचे दागिने मिळाले. चौकशी केल्यानंतर त्याने आणि निरंजन कुरणे याने सुलताना मुलाणी हिच्या सांगण्यावरून लवंग मळा, कडेपूर येथे शेतात दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून दागिने काढून घेतल्याची कबुली दिली. तसेच कसून चौकशी केल्यानंतर अभिषेक, निरंजन आणि सौरभ या तिघांनी पेठ, कार्वे, देवनगर या ठिकाणी जबरी चोरी व चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. कसून चौकशी केल्यानंतर तिघांकडून सोन्याचे मणी मंगळसूत्र, टॉप, दोन वाट्या असे ४ लाख ३५ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने, ७० हजारांची दुचाकी, १० हजाराचा मोबाइल असा ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांना कडेगाव, इस्लामपूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, सुनील जाधव, सूरज थोरात, सोमनाथ पतंगे, सुशांत चिले, गणेश शिंदे, सायबर ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विवेक साळुंखे यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी