शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बांबवडेत आढळले बिबट्याचे तीन बछडे, वनविभागाने बछड्यांना मादी घेवून जाण्यासाठी नैसर्गिक अधिवासात ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 17:28 IST

हालचाली टिपण्यासाठी दोन कॅमेरेही लावले

शिराळा : बांबवडे (ता.शिराळा) येथील खोलागिरी नावाच्या शिवारात मंगळवारी ऊसतोड कामगारांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. मादी या बछड्यांना नेण्यासाठी येण्याची शक्यता असल्याने वनविभागाने त्याच ठिकाणी नैसर्गिक अधिवासात हे बछडे ठेवले असून, त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी दोन कॅमेरेही लावले आहेत. एक महिन्याच्या आतील दोन नर व एक मादी असे हे बछडे आहेत.बांबवडे येथील खोलागिरी परिसरातील कारीची पट्टी येथील भानुदास माने यांच्या शेतात मंगळवारी ऊसतोड सुरू होती. दुपारी तीन वाजण्याच्यादरम्यान एका ऊसतोड महिला कामगारास तीन बिबट्यांचे बछडे दिसले. घाबरून तिने आरडाओरडा केला. यावेळी तेथे उपस्थित नागरिक व ऊसतोड कामगारांनी ऊसतोड थांबवून त्वरित शिराळा वनक्षेत्रपाल कार्यालयास माहिती दिली.तातडीने उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली महांतेश बगळे, मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील, वनरक्षक देविका ताहसीलदार, वनपाल चंद्रकांत देशमुख, प्रकाश पाटील, अमित कुंभार आदी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली तसेच बिबट्या मादी परिसरात असल्याची शक्यता वर्तविली.

ती बछड्यांना नेण्यासाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी तीनही बछड्यांंना संजय माने यांच्या शेतामध्ये नैसर्गिक अधिवासामध्ये सुरक्षितपणे एका ट्रेमध्ये ठेवले. या क्षेत्राजवळ दोन कॅमेरे लावून या परिसरात टेहळणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्याforest departmentवनविभाग