शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

जुनोनीजवळ तिहेरी अपघातात कुकटोळीच्या दोघांसह तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:41 IST

सांगोला/सांगली : भरधाव पिकअपने दुचाकीसह दुसऱ्या पिकअपला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघांसह क्लिनर, असे ...

सांगोला/सांगली : भरधाव पिकअपने दुचाकीसह दुसऱ्या पिकअपला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघांसह क्लिनर, असे तिघेजण जागीच ठार झाले. पिकअपचा एक चालक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दुसरा चालक किरकोळ जखमी आहे. हा भीषण अपघात बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सांगोला- मिरज रोडवरील जुनोनी गावाजवळ घडला.अजित रंगराव तुरुके (वय ४०) व सागर रघुनाथ पडुळकर (३२, रा. दोघेही कुकटोळी ता. कवठेमहंकाळ, जि. सांगली) तर क्लिनर अक्षय आनंद जाधव (२३, रा. तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अपघातातील ठार झालेल्या मृतांची नावे आहेत. सुदाम बंडू पन्हाळकर (रा. नालवंडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे गंभीर जखमी चालकाचे नाव आहे. जोतिबा आण्णासाहेब मोरे (रा. रांगोळे, ता. हातकणंगले) असे किरकोळ जखमी चालकाचे नाव आहे. अपघातानंतर दोन्ही पिकअप एकमेकांवर पलटी झाल्याने दुचाकीसह चक्काचूर होऊन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.कुकटोळी (ता. कवठेमहंकाळ) येथील अजित तुरुके व सागर पडुळकर हे दोघे (एम एच १० बीओ ६३७६) या दुचाकीवरून बुरंगेवाडी (जवळा) येथील मित्राच्या मेहुण्याचे लग्न उरकून जुनोनीमार्गे त्यांच्या गावाकडे परत निघाले होते, तर सांगोल्याकडून त्याच्याच पाठीमागे इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील आईस्क्रीम व पिझ्झा वाहतूक करणारा (एम एच ०९ ईएम- ८६६०) पिकअप मिरजेच्या दिशेने जात होता. मिरजेकडून भरधाव येणाºया एम एच २३ -५०१९) या पिकअपने जुनोनी गावाजवळ हॉटेल वरदानंदनसमोर समोरून येणाºया प्रथम दुचाकीला जोराची धडक देऊन पिकअपवर जोरात आदळल्याने हा भीषण अपघात घडला. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.