शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

साडेतीन हजार गणेशमूर्ती जलकुंडात विसर्जित

By admin | Updated: September 24, 2015 00:09 IST

जल प्रदूषणास आळा : महापालिकेचा उपक्रम; मूर्ती दानाला गणेशभक्तांकडून प्रतिसाद --

सांगली : जलप्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने जलकुंडात मूर्ती विसर्जित करण्याच्या उपक्रमास सांगलीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विसर्जनाच्या पाचव्या दिवशी दोन हजार, तर बुधवारी सातव्या दिवशी दीड हजार अशा एकूण साडेतीन हजार मूर्ती भक्तांनी जलकुंडात विसर्जित करून जलप्रदूषण रोखले आहे. याशिवाय मूर्ती दान करण्यासाठी डॉल्फिन नेचर्स ग्रुप, कृष्णा व्हॅली रोटरी क्लब व कवठेपिरान (ता. मिरज) येथील ‘वन हार्ट बीट’ या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी मूर्ती दानचा उपक्रम हाती घेतला होता. पण त्यास थंडा प्रतिसाद मिळाला.नदी व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी शहरात अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. प्रत्येकवर्षी या संस्था गणेशोत्सवात सरकारी घाटावर गणेश भक्तांचे निर्माल्य नदीत टाकू नका, मूर्ती जलकुंडात विसर्जित करावी किंवा ती दान करावी, याविषयी प्रबोधन करतात. याशिवाय महापालिकेचे कर्मचारीही यामध्ये सहभागी होतात. महापालिका क्षेत्रातील गव्हर्न्मेंट कॉलनी, नेमिनाथनगर, सरकारी घाट, विश्रामबाग, संजयनगर, सह्याद्रीनगर यासह दहा ठिकाणी मूर्ती विसर्जन करण्यासाठी जलकुंड ठेवले आहेत. पाचव्या दिवशी दोन हजार मूर्ती भक्तांनी जलकुंडात विसर्जित केल्या. सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत पालिकेचे कर्मचारी व पर्यावरणप्रेमी संस्थांचे सदस्य घाटावर उपस्थित होते. त्यांनी केलेल्या आवाहनाला भक्तांनी प्रतिसाद दिला. सुमारे दोन हजार मूर्ती जलकुंडात विसर्जित केल्या. सातव्या दिवशी घरगुती गणपतींचे विसर्जन कमी झाले. त्यामुळे केवळ दीड हजार मूर्ती जलकुंडात विसर्जित झाल्या. नवव्या दिवशीही हा उपक्रम राबविला जाणार आहे. मूर्ती दानविषयी गणेशभक्तांमध्ये फारशी जागृती झालेली नाही. दान करण्याचे आवाहन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. काही भाविकांकडून मात्र मूर्तीचे दान केले जात आहे. (प्रतिनिधी)पन्नास मूर्तींचे दानडॉल्फिन नेचर्स ग्रुप, कृष्णा व्हॅली रोटरी क्लब व कवठेपिरान येथील वन हार्ट बीट यांनी भक्तांना मूर्ती दान करण्याचे आवाहन केले. त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाला. पाचव्यादिवशी केवळ २५ भक्तांनी मूर्ती दान केल्या, तर सातव्यादिवशी ३० भक्तांनी मूर्ती दान केल्या. वन हार्ट बीटचे रामकृष्ण पाटील हे स्वत: मूर्ती स्वीकारत होते. कवठेपिरानमध्ये त्यांच्या मालकीचे गोदाम आहे. तिथे या मूर्ती जतन करून ठेवतात. पुढीलवर्षी या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी देतात.