शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महापुराच्या तडाख्यात सांगली नगरवाचनालयाची जुनी ग्रंथसंपदा भिजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 20:01 IST

सांगलीतील २00५ चा महापूर लक्षात घेतल्यान अनेकांची फसगत झाली. यामुळे अनेकांनी घरे सोडली नाहीत. व्यापारी पेठांमधील साहित्यही यामुळे उद्ध्वस्त झाले. अनेक घरे पडली.

ठळक मुद्देसांगली नगरवाचनालयाला फटका

सांगली : महापुराच्या तडाख्यात संपूर्ण बाजारपेठ सापडली असताना, शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या सांगली जिल्हा नगरवाचनालयातील ५0 हजार पुस्तके भिजून नष्ट झाली आहेत. फर्निचर,खुर्च्या, पुस्तके मिळून २५ ते ३0 लाखाचे नुकसान झाले आहे.

सांगलीतील २00५ चा महापूर लक्षात घेतल्यान अनेकांची फसगत झाली. यामुळे अनेकांनी घरे सोडली नाहीत. व्यापारी पेठांमधील साहित्यही यामुळे उद्ध्वस्त झाले. अनेक घरे पडली. राजवाडा चौकातील नगरवाचनालय यावर्षी शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. दीडशेवे वर्ष विविध कार्यक्रमांनी साजरे होत आहे. या वर्षाची सांगता होत असतानाच या महापुराने होत्याचे नव्हते करून टाकले.

महापुरात नगरवाचनालयाची मोठी हानी झाली. वाचनालयातील ५0 हजाराहून अधिक पुस्तके पूर्णपणे भिजली आहेत. कर्मचाऱ्यांनी एखादा कचरा भरावा, तशी भिजलेली पुस्तके बाहेर आणून टाकली. जो कचरा म्हणूनच टाकला जाणार आहे. जुने ग्रंथही या महापुरात नष्ट झाले. फर्निचर, खुर्च्या, संगणकही नष्ट झाले आहेत. वाचनालयात महापुराचे पाणी तब्बल दहा फुटावर खेळत होते. यामुळे वाचनालयातील फर्निचर, खुर्च्या पाण्याच्या वेगाने फिरत होत्या.

वाचनालयाचे कार्यवाह अतुल गिजरे म्हणाले की, वाचनालयातील अनमोल ग्रंथसंपदा नष्ट झाली आहे. मूळ पदावर यायला किमान तीन-चार महिने लागतील. मोठे नुकसान झाले आहे. महापुराने सांगलीच्या नगर वाचनालयाचे मोठे नुकसान झाले आहे. इमारतीच्या तळमजल्यार असलेली तब्बल पन्नास हजारावर पुस्तके भिजली आहेत. सध्या इमारतीच्या दुसºया मजल्यावरील सभागृहात ही पुस्तके वाळविण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूरlibraryवाचनालय