शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून पूरग्रस्त मुलांसाठी हजारो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:56 IST

शंभर ब्लँकेटपासून सुरू झालेल्या त्यांच्या कामाचा विस्तार वाढत गेला. जीवनावश्यक वस्तूंचे प्रत्येक पूरग्रस्ताच्या घरी जाऊन वाटप केले.

ठळक मुद्देनेर्लेतील युवकांचा उपक्रम : जीवनोपयोगी साहित्य, औषधांचा सांगली, कोल्हापुरात पुरवठा

सांगली : सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास संकटग्रस्तांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो, ही गोष्ट नेर्ले (ता. वाळवा) येथील तरुणांनी दाखवून दिली. पूरग्रस्त गरीब कुटुंबातील मुलांना दत्तक घेण्यासाठी राज्यभरातील हजारावर लोकांनी त्यांच्याकडे नोंदणी केली आहे. साहित्यरूपी मदत, औषधांचा पुरवठा करण्यातही या ग्रुपने मध्यस्थाची भूमिका पार पाडली.

नेर्ले येथील नीलेश साठे, डॉ. विजय चांदणे, प्रा. विजय लोहार, सुरेश पाटील, तानाजी साठे यांनी एकत्रित येऊन पूरग्रस्तांसाठी मोठा सेतू सोशल मीडियाद्वारे उभारला. नीलेश साठे यांना ही संकल्पना सुचली. त्यांनी सुरुवातीला पूरग्रस्तांना ब्लँकेट वाटपासाठी राज्यभरातील काही मित्रांचा व्हॉट्स अ‍ॅपवर ‘पूरग्रस्त मदत ग्रुप’ सुरू केला. प्रत्येकाने शंभर रुपये जमा करावेत आणि कोणाचे आणखी मित्र मदतीसाठी इच्छुक असतील, त्यांना या ग्रुपवर समाविष्ट करण्याचे आवाहन केले. शंभर ब्लँकेटपासून सुरू झालेल्या त्यांच्या कामाचा विस्तार वाढत गेला. जीवनावश्यक वस्तूंचे प्रत्येक पूरग्रस्ताच्या घरी जाऊन वाटप केले. त्याची छायाचित्रे ग्रुपवर प्रसिद्ध केली. ग्रुपने जिंकलेल्या विश्वासामुळे मदत करणाऱ्यांची संख्या वाढत गेली.

शिरगाव येथील महिलेचे घर महापुरात उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ ग्रुपवरून व्हायरल केला. महिलेचे नाव, तिचा बँक खाते क्रमांकही प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे राज्यभरातून दीड लाखाची मदत तिच्या खात्यावर जमा झाली. अशाचपद्धतीने त्यांनी गरीब पूरग्रस्तांच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांना दत्तक घेण्यास कुणी इच्छुक आहे का, अशी विचारणा ग्रुपवरून केली. या विद्यार्थ्यांच्या किंवा तिच्या आईच्या बँक खात्यावर शैक्षणिक वर्षाचे दीड हजार जमा करण्याबाबत त्यांनी आवाहन केले. त्यास प्रतिसाद मिळत राज्यभरातून एक हजारावर लोकांनी दत्तक योजनेसाठी नोंदणी केली.थेट लाभाची यंत्रणासांगलीतील आरोग्य विभागाला औषधांचाही मोठ्या प्रमाणावर या ग्रुपने पुरवठा केला. अनेक शासकीय अधिकारी, विविध सामाजिक संघटना या ग्रुपशी संपर्क करून आवश्यक गोष्टींची मागणी करीत आहेत. पूरग्रस्तांना थेट लाभ देण्याची यंत्रणा या ग्रुपने उभारली आहे. आजअखेर २0 हजार पूरग्रस्तांच्या घरांपर्यंत हा ग्रुप पोहोचला आहे.

 

टॅग्स :Sangliसांगली