शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात; मदतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 03:12 IST

सांगली : जिल्ह्याला बसलेला महापुराचा विळखा अजूनही घट्टच आहे. वाढलेली नद्यांची पाणीपातळी मंदगतीने उतरत असल्याने धास्ती कायम आहे. अजूनी ...

सांगली : जिल्ह्याला बसलेला महापुराचा विळखा अजूनही घट्टच आहे. वाढलेली नद्यांची पाणीपातळी मंदगतीने उतरत असल्याने धास्ती कायम आहे. अजूनी ३० हजार नागरिक पुराच्या विळख्यात असून काहींना होड्या पाठवून बाहेर काढण्यात आले.सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाण्याची पातळी मंदगतीने ओसरत आहे. पन्नासवर प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जवळपास १०० गावे महापुराने बाधित आहेत. यातील एकाही गावाची अद्याप सुटका झालेली नाही.अडकलेल्या पूरग्रस्तांना काढण्यासाठी शुक्रवारी जादा कुमक मागवून प्रयत्न करण्यात आले. अनेक पूरग्रस्तांना सोडविण्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेस यश आले असले, तरी पुरात अडकलेल्या लोकांची संख्या अजूनही ३० हजाराच्या घरात आहे. हरिपूर, सांगलीवाडी येथे मोठ्या प्रमाणावर लोक अडकून आहेत. त्यांना अन्नाची पाकिटे हेलिकॉप्टरने देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची अजूनही कसरत सुरूच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.दिवसभरात केवळ ३ इंच घट : सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील पाणीपातळीत दिवसभरात केवळ तीन इंचांची घट झाली. सकाळी ७ वाजता ५७.५ फुटांवर असलेली पाणीपातळी सायंकाळी केवळ ५७.३ फूट झाली. पूर मंदगतीने ओसरत असल्याने जनजीवन ठप्पच आहे.टँकरने पाणीपुरवठा : पूरग्रस्तांचे जेथे पुनर्वसन करण्यात आले आहे, त्याठिकाणी महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्वच नागरिकांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने सर्व प्रभागात टँकरने पाणीपुरवठा करता येणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेने केवळ पाणीपुरवठा बंदचाच गजर सुरू केला आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूर