शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

‘त्या’ विद्यार्थ्यांच्या भविष्याला आर्थिक मदतीचे कोंदण!

By admin | Updated: June 20, 2014 00:36 IST

जिद्दीला साथ : सुरेश पाटील यांनी घेतली जबाबदारी

सांगली : सर्वोेदय हायस्कूलमधील वैभव हेगडे आणि स्रेहल कांबळे या दोन विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले. ‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाल्यावर त्याची दखल खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी घेतली. या दोघा गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च करण्याचे आश्वासनही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर सर्वाेदय हायस्कूलमधील बांधकाम मजुराचा मुलगा वैभव हेगडे आणि एका पेंटरची मुलगी स्नेहल कांबळे या दहावीतील विद्यार्थ्यांनी चांगले गुण संपादन केले. वैभवने वाढप्याचे काम करीत ८७ टक्के, तर स्रेहलने आईला घरकामात मदत करीत ७६ टक्क्यांपर्यंत मजल मारली. दहावी तर झाली, आता पुढे काय? असा प्रश्न वैभव आणि स्रेहल यांच्या पालकांसमोर होता. यशाचा अचूक वेध घेताना दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीचे रडगाणे गात न बसता धैर्याने संकटाचा सामना केला. नेमकी हीच वस्तुस्थिती ‘लोकमत’ने वाचकांसमोर मांडली. त्यांच्या जिद्दीची कहाणी वाचल्यानंतर सुरेश पाटील यांनी तात्काळ ‘लोकमत’च्या कार्यालयास संपर्क साधून त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. वैभवला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जायचे असून स्रेहलला वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. दोघांनाही शैक्षणिक विश्वाच्या विस्तीर्ण आकाशात उंच भरारी घ्यायची आहे. यासाठी त्यांना आता ‘आर्थिक’ मदतीचे पंख लाभले आहेत. दोघेही दहावीपेक्षा उत्तम यश संपादन करतील, असा विश्वास शाळेतील शिक्षकांसह, त्यांच्या आई-वडिलांना आहे. (प्रतिनिधी)