शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- बाजार समिती निवडणूक: तासगावला आमदार, खासदारांच्या विरोधात तिसऱ्या आघाडीची मोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 18:55 IST

भाजप, राष्ट्रवादीचे नेते झाले सावध 

दत्ता पाटीलतासगाव : भाजपचे खासदार संजय पाटील आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या विरोधात तासगाव बाजार समितीसाठी तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतल्याची चर्चा आहे. दोन्ही नेत्यांना सक्षम तिसरा पर्याय देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तिसरी आघाडी निर्माण झाल्यास त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.येणाऱ्या काळात तालुक्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या निवडणुकीचा कौल निर्णय ठरणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून खासदार संजय पाटील, प्रभाकर पाटील, राष्ट्रवादीकडून आ. सुमनताई पाटील, रोहित पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. यापूर्वी बाजार समितीत राजकीय हेवेदावे बाजूला सारून बिनविरोध करण्यास प्राधान्य दिल्याचा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याबाबत नेमके चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र मतदारसंघात आमदार आणि खासदार यांना वगळून सक्षम तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याच्या हालचाली काही प्रमुख नेत्यांकडून सुरू आहेत. भाजप, राष्ट्रवादीचे नेते झाले सावध नुकतीच तिसऱ्या आघाडीच्या बाबतीत सावर्डे येथे तालुक्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. या बैठकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध होऊन व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीत कोण सहभागी होणार, तिसरी आघाडी सक्षमपणे भाजप व राष्ट्रवादीला पर्याय देणार का? याचे तालुक्यात कुतूहल आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकPoliticsराजकारण