शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अटलबिहारी की सिंधुताई? नगरसेवकांची हातघाई, सांगली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रणकंदन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 12:30 IST

सांगली : नेमीनाथगरमधील बालोद्यानाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यायचे की सिंधुताई सपकाळ यांचे, या विषयावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रणकंदन ...

सांगली : नेमीनाथगरमधील बालोद्यानाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यायचे की सिंधुताई सपकाळ यांचे, या विषयावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रणकंदन झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप नगरसेवक आमनेसामने आले. अखेर कोणताही निर्णय न होता विषय गुंडाळला गेला. सभेत दिवसभर श्रेयवादाचेच राजकारण सुरू होते.महापालिकेने नेमीनाथनगरमध्ये बालोद्यान (चिल्ड्रन पार्क) उभारले आहे. त्याला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची ठराव नगरसेविका गीतांजली ढोपे-पाटील यांनी तीन-चार महिन्यांपूर्वी मांडला होता. त्याला मंजुरीही मिळाली होती, पण महापालिका अंमलबजावणी करत नसल्याने त्यांनी रुद्रावतार धारण केला. त्यावर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी उत्तर देण्यापूर्वीच विष्णू माने बोलायला उभारले. बालोद्यानाला सिंधुताई सपकाळ यांचे नाव देण्याची मागणी केली. त्यामुळे भाजप नगरसेवकांच्या संतापाचा उद्रेक झाला. सर्वपक्षीय नगरसेवक आमनेसामने आले. घोषणाबाजी सुरू झाली. भाजपाचा धिक्कार असो, महापौरांचा विजय असो अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. सुमारे अर्धा तास गदारोळ सुरू होता. अखेर विषय तसाच गुंडाळला गेला.

कोण काय म्हणाले?

  • कुपवाड अजूनही अंधारात, विद्युत विभागातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना महापालिका पोसतेय. त्यांना काढून टाका. - विजय घाडगे
  • विद्युत विभागातील अतिरिक्त कर्मचारी पाणीपट्टी वसुलीला पाठवा. - जगन्नाथ ठोकळे
  • टक्के सगळ्याच नगरसेवकांना इंग्रजी येत नाही, मोठ्या कामाचे प्रस्ताव मराठीत करा. - संजय मेंढे
  • समुद्रा कंपनीसोबत एलईडी करारावर अधिकाऱ्यांनी डोळे झाकून सह्या केल्या. - विष्णू माने
  • शहरातील अनेक दिवे बसवल्यापासून बंदच. शिक्षण मंडळ नियुक्त करा, लोकसहभागातून शाळा सक्षम करा - संतोष पाटील
  • कुपवाडमध्ये मंडई, बालोद्यान करा - शेडजी मोहिते

अनिता वनखंडे सभागृहाबाहेरसमाजकल्याण सभापती अनिता वनखंडे यांना रुग्णालयाच्या दुरवस्थेविषयी बोलायचे होते, पण महापौरांनी बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे त्या रागाने निघून गेल्या. सभागृह नेत्या भारती दिगडे यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दिगडे कडाडल्या, ५० नगरसेवक निवडून आणूभारती दिगडे म्हणाल्या, बालोद्यानाला वाजपेयींचे नाव देण्यास होणारा विरोध निषेधार्ह आहे. पण महापालिकेत आम्ही ५० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू, तेव्हा सांगलीत सर्वत्र आम्हीच नावे देऊन दाखवू.

टॅग्स :Sangliसांगली