शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ संस्था उभी करायचीही अक्कल नाही! : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:45 IST

इस्लामपूर : या भागातला एक राज्यमंत्री, कुणाच्या जिवावर कुणाशी खेटतो आहे. एक संस्था उभी करण्याची अक्कल नाही आणि निघालेत लढायला.

ठळक मुद्दे सदाभाऊ खोत यांच्यावर हल्लाबोल; इस्लामपुरात राष्ट्रवादीची सभा; जयंतरावांचे शक्तिप्रदर्शन

इस्लामपूर : या भागातला एक राज्यमंत्री, कुणाच्या जिवावर कुणाशी खेटतो आहे. एक संस्था उभी करण्याची अक्कल नाही आणि निघालेत लढायला. गोतावळ्यातच कृषी अवजारांचा घोटाळा करणाऱ्यांनी जयंतरावांच्या नादाला लागू नये, असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा नामोल्लेख टाळून राष्ट्र वादीचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

येथील नगरपालिकेच्या जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात कार्यकर्ते आणि जनतेच्या गर्दीने खचाखच भरलेल्या जनसमुदायाच्या साक्षीने केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसने सुरू केलेल्या हल्लाबोल यात्रेतील ६३ वी सभा झाली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, राज्य बॅँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुंडे म्हणाले, शुक्रवारी भाजपचा स्थापना दिवस आहे. मुंबईतील मेळाव्याच्या पूर्वसंध्येला इस्लामपुरात होणारी हल्लाबोलची ही विक्रमी सभा राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार उलथवून टाकणारी ठरेल. राज्यातील जनता या फसव्या सरकारला कंटाळली आहे. अच्छे दिनच्या नावावर मोदींनी फसवले. त्यांच्या फसवेगिरीमुळे जनतेच्या बॅँक खात्यात नव्हे, तर डोक्यावर १५ लाखांचे कर्ज होईल. देशासमोर असंख्य प्रश्न असताना हे सरकार धार्मिक मुद्दे चर्चेला ठेवत आहे. मोदी-फडणवीसांनी तरुणांची, शेतकºयांची, व्यापाºयांची फसवणूक केली आहे. हे सर्व घटक मोदींना संपवणार आहेत. देशाच्या राजकारणात भाजप दिसणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करूया.

आ. जयंत पाटील म्हणाले, उंदरात पण पैसे खाता येतात, हे दाखविणारे भाजप सरकार मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावरही पांघरूण घालत आहे. आमच्या आघाडी सरकारवर भ्रष्टाचारी म्हणून भुई थोपटली. अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर अनेक आरोप केले; मात्र गेल्या चार वर्षांत त्यांना एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही. जनतेची फसवणूक करणाºया केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा जनाधार कमी झाला आहे. त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला जनता, इतर राजकीय पक्ष आणि न्यायाधीशही कंटाळले आहेत. इंदिरा गांधी, वाजपेयी यांचे सरकार जनतेने उलथवले, तेथे मोदी-फडणवीसांची काय गोष्ट आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अण्णासाहेब डांगे, दिलीपराव पाटील, खंडेराव जाधव यांच्यासह इतर अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आ. सुमनताई पाटील, प्रा. शामराव पाटील, पी. आर. पाटील, विनायकराव पाटील, संग्राम कोते-पाटील, सुरेखा ठाकरे, माजी आमदार जयदेव गायकवाड, अ‍ॅड. धैर्यशील पाटील, शहाजी पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, सुरेंद्र पाटील, प्रतीक पाटील, संग्रामसिंह पाटील, चिपळूणच्या सभापती पूजा निकम उपस्थित होत्या. विजय पाटील यांनी स्वागत केले. संजय पाटील यांनी आभार मानले.भाजपचे नाकाम सरकार बदला : पवारमाजी उपमुख्यमंत्री, आमदार अजित पवार म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजपचे नाकाम सरकार बदलण्याची वेळ आली आहे. भाजप-सेना एकाच माळेचे मणी आहेत. त्यांना ग्रामीण भागाचे प्रश्नच माहीत नाहीत आणि छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करतात. छत्रपतींच्या बदनामीचा निषेध करणाºयांवर गुन्हे दाखल होत आहेत. यावरून त्यांचा बेगडीपणा स्पष्ट होतो. चंद्रकांतदादा कर्नाटकावर प्रेम करतात, तर सुभाष देशमुख सरळ सरळ खोटे बोलतात. त्यावरून हे दरिद्री सरकार बेजबाबदारपणे काम करीत असल्याचे स्पष्ट होते. या सरकारला सत्तेवरून बाजूला करण्यासाठी जनतेने राष्टÑवादी कॉँग्रेसला साथ द्यावी.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणDhananjay Mundeधनंजय मुंडे