सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्यादिवशी जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. दरम्यान, आठ विधानसभा मतदारसंघात आज (शनिवार) १६८ अर्जांची विक्री झाली. जिल्ह्यामधील आठ विधानसभा मतदारसंघात आज १६८ अर्जांची विक्री झाली असून, यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघात १३, सांगली विधानसभा मतदारसंघात २५, वाळवा १०, शिराळा ५, पलूस, कडेगाव ४२ , खानापूर २३, तासगाव, कवठेमहांकाळ १३ आणि जत विधानसभा मतदारसंघात ३७ अर्जांची विक्री झाली आहे. सांगलीसाठी आज सुधीर गाडगीळ, डॉ. जयश्री पाटील, सायकलपटू दत्ता पाटील, अशोक वारे, नसीमा महात आदींनी अर्ज नेले. मिरजेसाठी मोहन व्हनखंडे, नसीम खतीब, प्रतीक्षा सोनवणे, योगेंद्र थोरात आदींचा अर्ज नेणाऱ्यांमध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)
विधानसभेसाठी पहिल्यादिवशी एकही अर्ज दाखल नाही
By admin | Updated: September 21, 2014 00:44 IST