शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात कोरोना लसीचा साठाच नाही!, बूस्टर डोससाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 16:39 IST

चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ हाेत असल्याने देशभरात सतर्कतेच्या सूचना देण्यात आत्या आहेत

विकास शहाशिराळा : कोरोनाच्या नव्या लाटेबाबत शक्यता वर्तविण्यात येत असल्याने कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. परंतु, लसीचा साठा नसल्याने लाभार्थ्यांना माघारी जावे लागत आहे.चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ हाेत असल्याने देशभरात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व रुग्णालयांची पाहणीही करण्यात आली आहे. सध्या कोव्हॅक्सिन लसीचा साठा शिल्लक आहे.परंतु, कोविशिल्ड लस उपलब्ध नाही. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोससाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी यापूर्वी प्रशासनाने लसीच्या साठ्याची तरतूद केली होती. मात्र, सामान्यांनी त्याकडे पाठ फिरविल्याने लससाठा वाया गेला. आता लाेक बूस्टर डाेससाठी येत आहेत. मात्र, लस नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागत आहे.

चीनमधील बीएफ ७ हा विषाणू घातक नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी घाबरून जाऊ नये. मास्क व सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीने संसर्ग टाळणे शक्य आहे. त्यामुळे सामान्यांनी लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा. - गणेश शिंदे, तहसीलदार, शिराळा 

गर्भवती, सहव्याधीग्रस्त व्यक्ती, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. या गटातील व्यक्ती संसर्गाला लगेच बळी पडू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळायला हवे. याखेरीज आवश्यकता भासल्यास कोविड वर्तणुकीचे नियम पाळावेत. देशात ९५ टक्के नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. अनेकांनी बूस्टर डाेसही घेतला आहे. कोरोना लाटांच्या नियंत्रणाचाही सक्षम अनुभव आपल्याकडील यंत्रणांकडे आहे. त्यामुळे सामान्यांनी बेफिकीर न राहता केवळ नियम पाळावेत. - डॉ. प्रवीण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस