शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील बहे गावात १०० वर्षांपासून स्मशानभूमीच नाही, दहनवेळी नातेवाईकच भोगतायत मरण यातना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 16:22 IST

अशोक पाटील इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी बहे (ता. वाळवा) येथे कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला. ...

अशोक पाटीलइस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी बहे (ता. वाळवा) येथे कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला. गावाचा चेहरा-मोहरा बदलला, असा स्थानिक नेत्यांचा दावा आहे; परंतु, गेल्या १०० वर्षांपासून स्मशानभूमीच नाही, त्यामुळे पवित्र रामलिंग बेटाच्या परिसरातील कृष्णा नदीच्या पात्रातच उघड्यावर दहन केले जाते. यावेळी उपस्थित असलेल्या नातेवाइकांना मरणयातना भोगाव्या लागतात.दिवंगत मंत्री यशवंतराव मोहिते दिवंगत मंत्री राजारामबापू पाटील यांच्या प्रेरणेतून कृष्णा खोऱ्यात दोन साखर कारखाने उभे राहिले. याच माध्यमातून कृष्णा काठी वसलेल्या बहे गावाची प्रगती २१व्या शतकाकडे झेपावली; परंतु, गेल्या १०० वर्षांपासून येथे स्मशानभूमीच नाही.कृष्णेला पूर आल्यानंतर गावाचा संपर्क तुटतो. यासाठी इस्लामपूर बहे रोडवर २००८ साली चार कोटी रुपये खर्च करून पूल उभा करण्यात आला. रामलिंग बेटाला पौराणिक इतिहास आहे. येथे ११ मारुतींपैकी एक देवस्थान आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. येथील पर्यटनासाठी पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही पर्यटनाला गती नाही.गावातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. यातून गावाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने १०० वर्षांपासून नदीच्या पात्रातच उघड्यावर दहन केले जाते. पावसाळ्यात स्मशानभूमीमध्ये पाणी आल्यानंतर ग्रामस्थ पुलाच्या रस्त्यावरच दहन विधी उरकतात. यावेळी नातेवाइकांचे मोठे हाल होतात. उन्हाळ्यातही अशीच अवस्था असते. एकंदरीत २१व्या शतकाकडे झुकणाऱ्या गावात स्मशानभूमी नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

स्मशानभूमीसाठी जागा नाही हा दावा चुकीचा मानला जातो. आधुनिक काळात समुद्रातही मोठे पिलर्स उभे राहतात. नदीच्या पात्रातच पिलर उभे करून पुलाबरोबरीने अत्याधुनिक स्मशानभूमी उभी राहू शकते. त्यामुळे रामलिंग बेटाच्या सौंदर्यातही भर पडेल.

तत्कालीन सरपंच छायाताई पाटील यांच्या कारकिर्दीत स्मशानभूमीसाठी २० लाख रुपये निधी आला होता. जागेअभावी हा निधी परत गेला. ग्रामस्थांच्या सोईसाठी स्मशानभूमी उभी करण्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत; परंतु, त्या परिसरातील नागरिकांनी सहकार्य केल्यास स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागेल. -विठ्ठल पाटील, संचालक- राजारामबापू पाटील साखर कारखाना

टॅग्स :Sangliसांगली