शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँकांचा हात आखडता, वितरणात किती कोटींची तफावत.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:14 IST

रब्बी हंगामासाठी बँकांना किती कोटींचे उद्दिष्ट.. वाचा

सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांसाठी पीक कर्जाचे २ हजार १३ कोटी ३० लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. पण, ऑगस्टअखेर पीककर्जाचे १ हजार ४६७ कोटी ३५ लाख कर्जाचे वाटप केले आहे. खरीप पीककर्ज वितरणात ५४६ कोटी रुपयांची तफावत आहे. पुढच्या महिन्यापासून रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वितरण सुरू होईल, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यातील जिल्हा बँक, राष्ट्रीय, व्यापारी बँका, खासगी, ग्रामीण बँकांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील ऊस, सोयाबीन यासह डाळिंब, द्राक्ष पिकांसाठी पीककर्ज दिले आहे. २०२५च्या खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेसाठी ९३ हजार ३६७ शेतकऱ्यांना १ हजार १३३ कोटी ५६ लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. १ लाख १६ हजार ७०९ शेतकऱ्यांना १ हजार ४८ कोटी ९२ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बँकेकडूनच सर्वाधिक पीककर्ज वाटप झाले आहे. राष्ट्रीय, व्यापारी बँकांना ४७ हजार ५५१ शेतकऱ्यांना ५७८ कोटी ३१ लाख उद्दिष्ट होते. त्यापैकी केवळ १३ हजार ८२४ शेतकऱ्यांना ३०३ कोटी ८९ लाख रुपये कर्ज वाटप झाले आहे. खासगी बँकांसाठी २४ हजार २९४ शेतकऱ्यांना २९५ कोटी ८२ लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्टापैकी २ हजार ४१५ शेतकऱ्यांना ११० कोटी ९२ लाख रुपये वाटप केले. ग्रामीण बँकांना ४५३ शेतकऱ्यांना ५ कोटी ६१ लाख उद्दिष्ट असताना केवळ २१५ शेतकऱ्यांना ३ कोटी ६२ लाख रुपये वाटप केले आहे. पीककर्ज वाटपात बहुतांश बँकांनी हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे. खरिपासाठी सप्टेंबरअखेर कर्ज वितरीत केले जाते. अर्थात अद्याप कर्ज वितरणासाठी १३ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे ९० टक्क्यांपर्यंत कर्ज वितरण होईल, असा अंदाज जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने व्यक्त केला.

रब्बी हंगामासाठी १,३४२ कोटींचे बँकांना उद्दिष्टरब्बी हंगामातील कर्ज वितरण ऑक्टोबरपासून सुरू होईल. रब्बी हंगामात १ लाख १२ हजार १८७ शेतकऱ्यांना १ हजार ३४२ कोटी ३९ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेला ३२ हजार ९९३ शेतकऱ्यांना ७५५ कोटी ७९ लाखाचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय, व्यापारी बँकांना ३२ हजार २०७ शेतकऱ्यांना ३८५ कोटी ६० लाख, खासगी बँकांसाठी १६ हजार ६६६ शेतकऱ्यांना १९७ कोटी २६ लाख आणि ग्रामीण बँकांना ३२१ शेतकऱ्यांना ३ कोटी ७४ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे.

ऑगस्टअखेर खरीप हंगामातील पीककर्ज वितरण स्थितीबँक /सभासद संख्या / रक्कमजिल्हा बँक - १,१६,७०९ / १०४८.९२ कोटीराष्ट्रीय, व्यापारी बँका - १३,८२४ / ३०३.८९ कोटीखासगी बँका - २,४१५ / ११०.९२ कोटीग्रामीण बँका - २१५ / ३.६२ कोटीएकूण - १,३३,१६३ / १४६७.६५ कोटी