शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगसाठी आकारले जाते शुल्क, मात्र सुरक्षेची जबाबदारी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 14:44 IST

सांगली शहरातील बाजारपेठेसह प्रमुख मार्गावरील वाहतुकीची कोंडी वाढतच चालली असताना, पार्किंगचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे.

सांगली : शहरातील बाजारपेठेसह प्रमुख मार्गावरील वाहतुकीची कोंडी वाढतच चालली असताना, पार्किंगचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. त्यातच बस स्थानक, रेल्वे स्थानकासह सार्वजनिक ठिकाणी लावलेली वाहनांना कोणीच वाली नसल्याचे चित्र असून, या ठिकाणी पार्किंगसाठी शुल्क आकारले जात असले, तरी त्याची सुरक्षेची जबाबदारी वाहनधारकांवर ढकलली जात आहे.शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातही सार्वजनिक ठिकाणाहून चोरीचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयाच्या पार्किंगमधून वाहनचोरीच्या घटना वाढल्या आहेत. यासाठी कोणतीही सुरक्षा यंत्रणा कार्यरत नाही. बस स्थानक, रेल्वे स्थानकामध्ये मात्र, ठरावीक शुल्क अदा केल्याशिवाय वाहन पार्क करू दिले जात नाही. या ठिकाणी वाहन लावल्यानंतर अनेक वेळा काही वस्तू तर कधी दुचाकीच लंपास होत आहेत.कोठे किती पार्किंग शुल्क?बस स्थानक : मध्यवर्ती बस स्थानकावर वाहनांची मोठी गर्दी असल्याने, सहा तासाला रक्कम घेतली जाते.रेल्वे स्थानक : पार्किंगमध्ये दहा रुपये स्वीकारले जातात. सध्या हळूहळू वाहनधारकांची गर्दी वाढत आहे.मॉल : शहरातील मॉलमध्ये दुचाकीला १० रुपये घेतले जातात. मात्र, सुरक्षेची जबाबदारी घेतली जात नाही.जबाबदारी वाहन मालकांचीचएसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मध्यवर्ती बस स्थानकातील पार्किंग व्यवस्था सध्या विस्कळीत आहे, तरीही अनेक वाहनधारकांची वाहने पार्किंग भागात आढळून आली. या ठिकाणी सुरक्षेसाठी कर्मचारी नियुक्त आहे.पार्किंग व्यवस्था करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता, आता वाहनांचीच संख्या इतकी वाढत आहे की, त्यावर लक्ष ठेवणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वाहनधारकांनीच अधिक दर्जेदार लॉकची सुविधा करून वाहनांची सुरक्षा बाळगावी, असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

पार्किंगसाठी नियोजन आवश्यकशहरातील प्रमुख मार्गावर वाहतुकीची समस्या जाणवत आहे. यासाठी पार्किंग व्यवस्था करण्यासाठी संबंधितांना सूचना देणार आहे. वाहनांची सुरक्षाही त्यांनीच घ्यावी, जेणेकरून चोरीच्या घटना घडणार नाहीत.  - प्रज्ञा देशमुख, सहा.पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.

टॅग्स :SangliसांगलीParkingपार्किंग