शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

...तर धरणग्रस्त तरुण नक्षलवादाकडे वळेल: गौरव नायकवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:16 IST

इस्लामपूर : गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून आंदोलन आणि चळवळी करूनही धरणग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. शासनाची धोरणे ही धरणग्रस्तांना ...

इस्लामपूर : गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून आंदोलन आणि चळवळी करूनही धरणग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. शासनाची धोरणे ही धरणग्रस्तांना नक्षलवादाकडे वळविणारी आहेत, असा आरोप करत धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा या शासनालाही घरात बसवू, असा इशारा वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संघटनेचे नेते गौरव नायकवडी यांनी सोमवारी दिला.धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनासह इतर मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली इशारा मोर्चा काढण्यात आला. जुन्या तहसील कचेरीजवळील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चातील गर्दीमुळे पेठ-सांगली महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.नायकवडी म्हणाले, आजचा मोर्चा हा समजणाऱ्यांसाठी इशारा आहे. अद्याप कित्येक धरणग्रस्तांना जमिनीचे आदेश मिळालेले नाहीत. धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्यात मंत्रीपद असूनही फक्त आश्वासने मिळाली आहेत. विद्यमान शासनाने वेळकाढूपणा केला, तर त्यांनाही घरात बसवू. धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्तांमध्ये शासनाकडून फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. यापुढे मागण्या मान्य न झाल्यास क्रांती अटळ असेल.नामदेव नांगरे, किरण नायकवडी, उमेश कानडे, आरिफ मुल्ला, धनाजी घोरपडे, मुसा घानवीलकर, भारत पाटील, श्रीपती पाटील, संपतराव बेलवलकर, अ‍ॅड. के. एस. पाटील, कासम वारुसे, पांडुरंग सावंत, अ‍ॅड. वसंत कांबळे उपस्थित होते. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी मोर्चास्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले.त्यांनी येत्या चार दिवसांत प्रांताधिकारी कार्यालयात व्यापक बैठक घेऊन सकारात्मक पध्दतीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असे स्पष्ट केले.अशा आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याउरमोडी व वांग प्रकल्पाप्रमाणे जून २००७ व आॅगस्ट २००७ च्या शासकीय आदेशांची अंमलबजावणी व्हावी, ६५ टक्के रक्कम भरून धरणग्रस्तांना आदेश द्यावेत, शासकीय नोकरी न मिळालेल्या तरुणांना प्रत्येकी २० लाख रुपये कायमस्वरुपी अनुदान मिळावे, धरणग्रस्तांच्या शेतजमिनीची कब्जेहक्काची रक्कम माफ व्हावी, शेतजमीन संपादनासाठी निधी उपलब्ध करा, धरण व अभयारण्यग्रस्तांना लाभक्षेत्रातील मिळालेल्या जमिनीला शासकीय दराने पाणी मिळावे, कागदपत्रांची पडताळणी करून संकलन दुरुस्ती व्हावी, शेतजमीन कसण्यास होणारे अडथळे दूर करावेत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.