शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा नदीवरील तिन्ही पुलांना जलसंपदाची परवानगीच नाही, बांधकाम विभागाकडून परस्परच काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 17:55 IST

सांगली : जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील हरिपूर, सांगली आयर्विन पूल, डिग्रज या तिन्ही पूल बांधकामास सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानाच घेतला ...

सांगली : जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील हरिपूर, सांगली आयर्विन पूल, डिग्रज या तिन्ही पूल बांधकामास सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानाच घेतला नाही, असे स्पष्टीकरण जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापूर नियंत्रण समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे.कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीचे सेवानिवृत्त अधिकारी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, सामाजिक कार्यकर्ते हनुमंतराव पवार, समिती निमंत्रक सर्जेराव पाटील, संजय कोरे, धनाजी चडमुंगे, दीपक पाटील, सुनील गरडे, प्रशांत शहा यांनी सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांची भेट घेतली.यावेळी समितीच्या सदस्यांनी कृष्णा नदीवरील हरिपूर, सांगली आयर्विन पुलाजवळ आणि मौजे डिग्रज येथे पूल बांधण्याचे काम चालू आहे. या पुलांचा भराव आणि त्यांची बांधण्याची पध्दत महापुरास कारणीभूत ठरणार आहे. यामुळे नदीजवळ भराव टाकू नये, याबाबत संबंधित विभागाला सूचना द्यावी, अशी मागणी केली.यावर अधीक्षक अभियंता नाईक यांनी कृष्णा नदीवरील पूल बांधकामासाठी आमच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानाच घेतला नाही. तसेच संबंधित पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत असल्यामुळे त्यांच्याशीच चर्चा करण्याची सूचना केली. नाईक यांच्या या उत्तरानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियमबाह्यच कृष्णा नदीवरील पुलांची बांधकामे होत असल्याचे उघडकीस आले.या प्रकाराबद्दल महापूर नियंत्रण समितीच्या अधिकाऱ्यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. हणमंतराव पवार यांनी सार्वजनिक बांधकाम, जलसंपदासह सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना एकत्रित करून जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेण्याबाबत प्रयत्न करूया, असे सांगितले.

नागपूर-रत्नागिरी रस्त्यामुळे पुराचा धोका वाढला

नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी धामणी, ता. मिरज येथे मोठ्या प्रमाणात भराव घातला आहे. या ठिकाणी जर पूल बांधला असता तर पुराचे पाणी खालून गेले असते; पण भराव घातल्यामुळे मिरज तालुक्यातील धामणी, अंकलीसह सांगली शहरातील शामरावनगर, विश्रामबागेला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, याकडे कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

टॅग्स :Sangliसांगली